सलमान खान, अक्षय कुमारसह इतर सेलिब्रिटींविरोधात तक्रार; बलात्काराशी संबंधित प्रकरणामुळं अडचणींत वाढ
साऱ्या देशाला हादरवणाऱ्या त्या घटनेसंबंधी...
मुंबई : साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या हैदराबादमधील बलात्कार प्रकरणाला जवळपास 2 वर्षे उलटून गेली. हैदराबापासून काहीच अंतरावर 26 वर्षीय वेटर्नरी डॉक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार करत अतिशय क्रूरपणे तिला जीवंत जाळण्यात आलं होतं. याच प्रकरणाशी जोडल्या गेलल्या महत्त्वाच्या घडामोडीचा फटका आता काही सेलिब्रिटींना बसत आहे.
दिल्लीस्थित एका वकिलांकडून बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील जवळपास 38 सेलिब्रिटींना अटक करण्याची मागणी करण्यासंबंधीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवी तेजा, रकुल प्रीत, सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासह इतरही बऱ्याच सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बलात्का पीडितेचं खरं नाव जाहीर केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील वकिल, गौरव गुलाटी यांनी सदर प्रकरणी सब्जी मंडी पोलीस स्थानकात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 228 अन्वये तीस हजारी कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सेलिब्रिटी जबाबदार नागरिक नसल्याचं यामध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे.
कायद्यानं बलात्कार पीडितेचं खरं नाव समोर आणण्यास विरोध असला तरीही सेलिब्रिटींनी या नियमाचं उल्लंघन केल्याचं म्हणत त्यांचा विरोध केला. या कारणामुळं सदर सेलिब्रिटींवर तात्काळ अटकेची कारवाई करावी, कारण त्यांनी पीडितेची गोपनियता पाळण्यात पूर्णत: बेजबाबदारपणा दाखवला होता.