मुंबई : देशात कोरोना विषाणूची चिंता वाढत असतानाच संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरवणारी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. दर्जेदार चित्रपट, मालिका, हॉलिवूड आणि बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेता Irrfan Khan  इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी सुरु असणाऱी त्यांची झुंज अखेर थांबली आणि कलाविश्वात एका पर्वाचा अंत झाला. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दोन दिवसांपूर्वीच त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण, अखेर आयुष्याशी सुरु असणारा त्यांचा हा लढा अपयशी ठरला. खान यांच्या निधनाचं वृत्त कळताच अनेकांनाच धक्का बसला. बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या अष्टपैलू अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. 


बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते चित्रपट वर्तुळातील अनेकांनीच हा आपल्यासाठी धक्का असल्याचं म्हणत इरफानच्या जाजाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 'मला आताच इरफान खान यांच्या जाण्याचं वृत्तं कळलं. ही मन हेलावणारी आणि अतिशय दु:खदायक अशी बातमी आहे. अदभूत कलावंत, एक उत्तम सहकारी ... तू आम्हा सर्वांना खूप लवकर सोडून गेलास. तेसुद्धा एक मोठी पोकळी निर्माण करुन....', या शब्दांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 







 


सनी देओल, अनुपम खेर, करण जोहर या अभिनेते, दिग्दर्शक या सर्वांनी इरफानच्या जाण्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. अतिशय अनपेक्षित अशी त्याची ही एक्झिट चाहत्यांसह अनेक कलाकार मित्रांच्या मनाला चटका लावून गेली. फक्त सेलिब्रिटी मित्रच नव्हे तर चाहत्यांनीही या अभनेत्याच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करत एका अभिनेत्यासोबतच एका अतिशय सहृदय व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.