PNB घोटाळ्यात `या` अभिनेत्री अडकल्या
`द डायमंड किंग` या नावाने प्रसिद्ध असलेल्या नीरव मोदीमुळे बॉलिवूडमधील अभिनेत्री बदनाम झाल्या आहेत.
मुंबई : 'द डायमंड किंग' या नावाने प्रसिद्ध असलेल्या नीरव मोदीमुळे बॉलिवूडमधील अभिनेत्री बदनाम झाल्या आहेत.
पीएनबी घोटाळ्यामुळे नीरव मोदी आणि पर्यायाने या अभिनेत्री देखील चर्चेत आल्या आहेत. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतच्या अनेक अभिनेत्री नीरव मोदी यांच्या ग्राहक आहेत. त्यामुळे आता या अभिनेत्रींचे कनेक्शन नीरव मोदीशी आहे.
सेलिब्रिटी का झाले बदनाम
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ते हॉलिवूडची केट विंसलेट सारख्या सेलिब्रिटीची नावे नीरव मोदीशी जोडला गेला आहे. हे सगळे नीरव मोदीचे क्लाइंट असून पीएनबी घोटाळ्या पाठोपाठ सगळ्यांनी आता नीरव मोदीशी असलेले करार मोडले आहेत. यामध्ये प्रियंका चोप्रा पाठोपाठ सिद्धार्थ मल्होत्राने देखील करार मोडला आहे.
या सेलिब्रिटी आहेत नीरव मोदीच्या क्लाइंट
अनुष्का शर्मा देखील आहे क्लाइंट : अनुष्काने देखील नीरव मोदीचं कलेक्शन घातलं आहे. नीरव मोदीच्या क्लाईंट लिस्टमध्ये कोहलीची पत्नी अनुष्का देखील सहभागी आहे. लक्स गोल्डन रोझ अॅवॉर्डच्या दरम्यान अनुष्का शर्माने नीरव मोदीच्या ब्रँडचे ईअरिंग आणि ब्रॉकेड रिंग घातली होती.
मीरा राजपूतचं देखील आलं नाव समोर
नीरव मोदीच्या ब्रँडसोबत शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत देखील जोडली गेली आहे. मीरा राजपूतने आपल्या रिसेप्शनसाठी नीरव मोदी ब्रँडची ज्वेलरी घातली होती.
केट विंसलेट
लोकप्रिय हॉलिवूड सिनेमा टायटॅनिक अभिनेत्री केट विंसलेट देखील नीरव मोदीची क्लाइंट आहे. एका कार्यक्रमात विंसलेटने नीरव मोदीच्या ब्रँडची ज्वेलरी घातली होती.
लीजा हेडन
सुपर मॉडेल अभिनेत्री लीसा हेडन देखील नीरव मोदीची ब्रँड ज्वेलरी प्रमोट करताना दिसली आहे. लीजा हेडनदेखील अनेक प्रिंट जाहिरातीमध्ये दिसली आहे. परदेशात लीजा हेडन या ब्रँडचा चेहरा राहिली आहे. न्यूयॉर्कमध्ये लाँचिंग केलं आहे.
सोनम कपूर
फॅशन आयकॉन असलेल्या सोनम कपूरने देखील अनेकदा नीरव मोदी ब्रँडची ज्वेलरी घातली देखील आहे आणि प्रमोट देखील केली आहे.
निम्रत कौर
देशभरातच नाही तर अनेक सेलिब्रिटी या ब्रँड ज्वेलरीला प्रमोट करत आहे. यामध्ये निम्रत कौरचं नाव देखील सहभागी आहे.