मुंबई : कधीकधी नशिबाची खेळी कोणालाही कळत नाही. कलाकार रुपेरी पडद्यावर ज्या आत्मियतेनं उतरतात तेव्हा त्यांच्या मनात सुरु असणाऱ्या वादळाचा तुम्ही आम्ही फार कमीच विचार करतो. अनेक कलाकार तर असे आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील आधार गमावूनही प्रेक्षकांपर्यंत याचा लवलेशही पोहोचू दिला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:च्या मुलाबाळांचं निधन झालेलं असतानाही ही मंडळी मोठ्या ताकदीनं प्रेक्षकांसमोर आली. त्यातलंच एक नाव आहे प्रकाश राज यांचं. 


अवघ्या पाच वर्षांचाच असताना प्रकाश राज यांचा मुलगा एका टेबलावरून पडला. पुढचे काही दिवस त्याची तब्येत खालावली आणि अखेर त्यानं जगाचा निरोप घेतला. 



अभिनेते गोविंदा यांच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य आपण कायमच पाहिलं. पण, तुम्हाला माहितीये का; अवघ्या चार महिन्यांची असतानाच त्यांच्या मुलीचं निधन झाल्याचं म्हटलं जातं. फार कमी लोकांना यासंदर्भातली माहिती असल्याचं कळतं. 



ऐन तारुण्यात, 31 व्या वर्षी अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या मुलीचं निधन झालं होतं. तिला जुवेनाईल डायबिटीज हा आजार होता. 



अभिनेते शेखर सुमन यांच्या मुलानं वयाच्या 11 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. 



ज्येष्ठ गायिका, आशा भोसले यांच्या तिन्ही मुलांपैकी दोघांचं निधन झालं आहे. जी मुलं त्यांच्यासाठी आधार होती, तिच त्यांच्यापासून कायमची दुरावली. 



गजल गायक जगजित सिंग यांच्या मुलाचा मृत्यू 1990 मध्ये एका दुर्घटनेमध्ये झाला होता. तर, 2009 मध्ये त्यांच्या मुलीनं आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं. 



अभिनेते कबीर बेदी यांच्या मुलानं वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा मनोरुग्ण असल्याचं म्हटलं गेलं होतं.