मुंबईः बॉलीवूड सेलिब्रिटींची लग्न जितकी चर्चेत राहतात, तितकीच प्रसिद्धी त्यांच्या घटस्फोटांचीही होते. यात रंजक गोष्ट म्हणजे घटस्फोट घेताना किंवा घेतल्यावर या सेलिब्रिटींच्या पोटगीची चर्चाही काही कमी होत नाही. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना घटस्फोटाच्या बदल्यात मोठी पोटगी द्यावी लागली. जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटींबद्दल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हृतिक रोशन आणि सुजैन खान: हृतिक आणि सुझैनचे 14 वर्षांचा संसार 2014 मध्ये तुटला. यादरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुझैनने हृतिककडून सुमारे 400 कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. मात्र, नंतर हृतिक रोशनने ट्विट करून या गोष्टीं फेटाळल्या होत्या. मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.



सैफ अली खान आणि अमृता सिंग: सैफ-अमृता यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. सैफने अमृताला 5 कोटींची पोटगी दिली. अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले.



संजय दत्त आणि रिया पिल्लई: संजयने त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लई हिला 1998 मध्ये घटस्फोट दिला. घटस्फोटापर्यंत तो रियाचा खर्च उचलत होता. याशिवाय त्याने रियाला सी-फेसिंग अपार्टमेंट आणि लक्झरी कारही दिली.



करिश्मा कपूर आणि संजय कपूर: 2016 मध्ये करिश्माचा बिझनेसमन संजय कपूर यांचा घटस्फोट झाला. यादरम्यान संजयने दोन्ही मुलांच्या नावे 14 कोटींचे बाँड खरेदी केले होते. याशिवाय करिश्माला संजयच्या वडिलांचे घरही देण्यात आले होते.



फरहान अख्तर आणि अधुना भाबानी: फरहान आणि अधुना यांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. फरहानने अधुनाला मासिक पोटगीऐवजी एकरकमी पोटगी दिली होती, मात्र ही रक्कम किती आहे हे उघड करण्यात आले नव्हते. रिपोर्ट्सनुसार, फरहानने पोटगीसोबत अधुनाला 10,000 स्क्वेअर फुटाचा बंगलाही दिला होता.