रोम : भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याला सुरुवात झाली आहे. इटलीमध्ये शुक्रवार २१ सप्टेंबरपासून हा सोहळा सुरू आहे. ३ दिवस हा सोहळा सुरु राहणार आहे. ईशा आणि आनंद यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली आहे. साखरपुड्याचे सगळे विधी इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डीमध्ये होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा आणि आनंदच्या साखरपुड्याला सोनम कपूर तिचा नवरा आनंद आहुजासोबत आली होती. इटलीच्या लेक कोमोमध्ये सोनमनं बोटिंगही केलं.



कपूर कुटुंबाचे सदस्यही साखरपुड्याला आले होते. बोनी कपूर, जान्हवी कपूर या कार्यक्रमाला आले होते. जान्हवी कपूरनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.



इटलीच्या लेक कोमोच्या किनाऱ्यावर सेलिब्रिटींची रांग लागली होती. फिल्मफेयरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले. प्रियांका चोप्रा तिचा होणारा नवरा निक जोनस आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत दिसले.



अभिनेत्री जुही चावलादेखील ईशा आणि आनंदच्या साखरपुड्याला आली होती.



एअरपोर्टवर भरपूर सामान घेऊन असलेल्या करण जोहरचा फोटो जान्हवीनं काढला आहे.



प्रसिद्ध गायक शान त्याची बायको सागरिकासोबत साखरपुड्याला आला होता.



अभिनेता अनिल कपूर काळा सूट घालून साखरपुड्याला आला होता.