ChatGPT News : हिंदी चित्रपट रसिकांना 90 च्या दशकातील काही Classic चित्रपटांची नावं विचारली असता अपेक्षित उत्तरं मिळतात. कोणाला एखाद्या चित्रपटाचं कथानक भावलेलं असतं, कोणाला गाणी, तर कोणाला त्यामध्ये असणाऱ्या कलाकारांचे अभिनय. अशा या चित्रपटांच्या यादीत असणारं आणि प्रभावी कलाकारांची फळी असणाऱ्या चित्रपटाचं नाव म्हणजे 'मासूम'. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं सिनेरसिकांसोबतच समीक्षकांनाही हैराण करून सोडलं. इथं सर्वाधिक कौतुक झालं ते म्हणजे शेखर कपूर यांच्या दिग्दर्शनाचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय संवेदनशील मुद्दा त्यांनी इथं तितक्याच सुरेख पद्धतीनं हाताळला आणि ही कलाकृती साकारत काही पडद्यामागच्या विषयांना प्रकाशझोतात आणलं. याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही चर्चा आता अचानकच सुरु झाली. पण, यासाठी निमित्त ठरलं ते म्हणजे कपूर यांची एक सोशल मीडिया पोस्ट आणि त्यांनी केलेला एक प्रयोग. (Bollywood Diector Shekhar Kapur asks ChatGPT to write Masoom 2 script shares result read details )


शेखर कपूर, चॅट जीपीटी आणि भविष्याची चिंता... 


इन्स्टाग्रामवर आपण चॅट जीपीटी (AI) अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरल्याचं सांगताना कपूर यांनी एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी ज्या चॅट जीपीटीमुळं कलात्मक लेखन करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे त्या माध्यमाचा वापर करत आपला अनुभव लिहिला. जिथं त्यांनी Masoom 2 ची कथा लिहून मागितली. 


AI नं अतिशय कमाल पद्धतीनं त्यांच्या चित्रपटाचा गाभा ओळखत एका कथेचा सांराश त्यांच्यासमोर सादर केला. 'जुगल हंसराजनं साकारलेल्या राहुल या पात्राच्या मनात कायमच त्याच्या वडिलांविषयी चीड असते. त्यांनी त्याला सुरुवातीला कायम नाकारल्यामुळंच ही भावना त्याच्या मनात घर करून असते. पुढे तो मोठा होतो आणि लग्नही करतो. पण, त्याआधीच त्याला स्वत:ची मुलं असतात. इथं जणू त्याला आपल्या वडिलांवर त्या काळात असलेल्या दडपणाचीच जाणीव होते आणि तो वडिलांना माफ करतो', हे असं कथानक त्यांना एआयनं दिलं. 



मी एआयपेक्षाही उत्तम पण... 


एआयनं दिलेली कथा पाहिल्यानंतर आपण लिहिलेली कथा याहून सुरेख असल्याचं कपूर म्हणाले खरे. पण, अवघ्या 30 सेकंदांमध्ये त्यानं मासूमविषयी लिहिलेलं सर्व वाचून काढत सादर केलेलं कथानक त्यांनाही हैराण करून सोडणारं होतं. सध्या हॉलिवूडमध्ये लेखकांची आंदोलनं का सुरु आहेत यामागचं कारण आपल्या आल्याचं म्हणत हे AI कलात्मक पदर असणारी कथानकंही लिहू शकतो ही वस्तुस्थिती त्यांनी यावेळी आपल्या पोस्टमधून मांडली.