मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये असणारी नात्यांची गणितं काही प्रमाणात बदलली. श्रीदेवी यांच्या मुली खुशी आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत असणारं बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांचं नातंही वेगळ्या वळणावर आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांनी खुशी, जान्हवीलाही आपल्या कुटुंबाचा एक भाग समजत त्यांना जवळ केलं. अशा या कुटुंबात सध्या काही सुरेख असे आनंदाचे क्षण पाहायला मिळाले. 


निमित्त होतं बोनी कपूर यांच्या वाढदिवसाचं. पत्नी श्रीदेवीच्या अनुपस्थितीतही बोनी यांनी कपूर कुटुंबीयांनी स्मरणात राहील अशा आठवणी दिल्या. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत त्यांचा वाढदिवस साजरा केला. 



सोशल मीडियावर अर्जुन कपूर, संजय कपूर यांनी या सुरेख क्षणाचा फोटोही पोस्ट केला. ज्यामध्ये बोनी यांची चारही मुलं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्याशिवाय कुटुंबातील इतरही मंडळी आणि त्यांची उपस्थिती बोनी यांच्या या दिवसाला आणखी खास करुन गेली.