बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने 'डॉन 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते प्रचंड उत्सुक आहेत. पण एका गोष्टीने मात्र चाहत्यांची निराशा केली आहे. पहिल्या दोन्ही चित्रपटांमध्ये डॉनची भूमिका निभावणारा शाहरुख खान या चित्रपटात दिसणार नाही. फऱहान अख्तरने शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंगला चित्रपटात घेतलं आहे. यामुळे शाहरुखचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. दरम्यान फरहानने स्वत: यामागील कारण सांगितलं आहे. तसंच त्याने डॉन 3 च्या प्लॉटसंबंधी कल्पनाही दिली आहे. 


शाहरुखच्या जागी रणवीर का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फरहान अख्तर सध्या 'डॉन 3' च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. त्याने चित्रपटाचा प्लॉट तयार केला आहे. याचमुळे त्याने शाहरुखच्या जागी रणवीर सिंगला कास्ट केलं आहे. आपण जी कथा लिहिली आहे, त्यात शाहरुख खान या भूमिकेसाठी फिट बसत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आपली शाहरुख खानसह काम करण्याची इच्छा आहे, मात्र चित्रपटाची कथा लक्षात घेता ते शक्य नाही असं त्याने सांगितलं आहे. 


फरहान अख्तरने फेय डिसूजाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "जेव्ही मी पहिल्यांदा डॉन 3 बद्दल विचार करण्यास सुरुवात केली तेव्हा नक्कीच मी डोक्यात शाहरुख खानला ठेवत लिहिण्याचा विचार केला. पण कोणत्याही प्रकारे आम्ही कथा पुढे घेऊन जाण्यात असमर्थ ठरत होतो. यावर आमचं एकमत झालं नाही. त्यामुळेच असं शक्य झालं नाही. त्यामुळे मी विचार केला की, यावेळी मी चित्रपटात नेमकं काय करु इच्छित आहे याचा विचार करायचा आणि थोडं मागे जाण्याचं ठरवलं".


डॉन हा डॉन कसा झाला यावर चित्रपट आधारित असणार?


फरहान अख्तरने सांगितलं की, "डॉनला डॉन बनवणाऱ्या गोष्टीकडे मी थोडा पुढे जाऊयात आणि लिहूयात असा मी विचार केला. यानंतर कथेत थोडा जीव येऊ लागला. यासाठी एका तरुण अभिनेत्याची गरज होती. यामुळे मी रणवीरचा विचार केला. तो मला या भूमिकेसाठी अगदी योग्य वाटला".


फऱहानच्या बोलण्यावरुन डॉन 3 चित्रपटाची कथा डॉनच्या खासगी आयुष्याभोवती फिरणारी असेल असं दिसत आहे. यामध्ये तो डॉन कसा झाला? याचा उलगडा होऊ शकतो. दरम्यान या चित्रपटात शोभिता धुलिपालाही दिसणार असल्याची चर्चा आहे. नुकतंच नागा चैतन्यसह विवाहबंधनात अडकल्याने ती चर्चेत आहे. एका आयटम साँगसाठी तिला विचारण्यात आल्याची माहिती आहे. 2025 मध्ये डॉन 3 रिलीज होणार आहे.