मुंबई : अभिनेता  sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या निधनांनं कलाविश्व हादरलं खरं. पण, अनेक अनुत्तरित प्रश्नांनीही डोकं वर काढलं. हीच सर्व परिस्थिती पाहता आता थेट मुंबई पोलिसांकडूनच या प्रकरणाची उकल करण्यासाठी म्हणून चौकशीची सत्र सुरु करण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत बॉलिवूडमधील ख्यातनाम दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीही त्यांचा जबाब नोंदवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी भन्साळी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहोचल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं. नेहमीच्याच रुपात भन्साळी पोलीस स्थानकात पोहोचले होते. 


सुशांतच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत भन्साळी यांनीही त्याच्यापुढं काही चित्रपटांचे प्रस्ताव ठेवले होते. पण, काही कारणास्तव ते आणि सुशांत एकत्र काम करु शकले नाहीत. यामध्ये तारखा उपलब्ध नसल्याचं म्हणजेच पुरेसा वेळ नसल्याचं एक कारण समोर येत आहे. 


सध्या सुरु असणाऱ्या एकंदर चर्चा पाहता भन्साळींना त्यांच्या गोलियों की रासलीला- रामलीला या चित्रपटात सुशांतची निवड करण्याविषयीचा प्रश्न विचारला गेला असू शकतो. सुशांतचा यशराज फिल्म्सशी असणारा करार पाहता, हे गणित निकाली निघालं नव्हतं त्यामुळं त्याबाबत भन्साळींपुढे प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. 



 


दरम्यान, आतापर्यंत सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी पोलिसांकडून 29 जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये कलाविशअवाशी संलग्न काही बड्या नावांचा समावेश आहे. येत्या काळात दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.