मुंबई : चित्रपट आणि खासगी आयुष्यामुळं कायमच चर्चेत असणाऱ्या दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाण्यास कारणंही तसं मोठं आहे. म्हणे विक्रम भट्ट यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईटाईम्सच्य वृत्तानुसार श्वेतांबरी सोनी असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. असं म्हटलं जात आहे की साधारण वर्षभरापूर्वीच ते विवाहबंधनात अडकले आहेत. पण, या नात्याचा खुलासा मात्र आता होताना दिसत आहे. असं असलं तरीही विक्रम यांना या लग्नाविषयी विचारलं गेलं तेव्हा मात्र त्यांनी यावर काहीही उत्तर न देण्यालाच पसंती दिली.


सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसारही विक्रम आणि श्वेतांबरी सोनी हे विवाहबंधनात अडकले आहेत. श्वेतांबरीसोबतची विक्रम यांची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरलही होत आहे. त्यामुळं या नात्याची बरीच चर्चा सध्या सुरु आहे.


यापूर्वी विक्रम भट्ट यांनी अदिती भट्टशी लग्न केलं होतं. त्यांना कृष्णा भट्ट अशी एक मुलगीही आहे. 1998 मध्ये त्यांच्या नात्यात घटस्फोटाचं वादळ आलं. यानंतर विक्रमनं सुष्मिता सेन आणि अमिषा पटेल यांनाही डेट केलं. असं म्हणतात की, विक्रम हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते.



सुष्मिता सेन हिच्यासोबतच्या नात्यामुळंही विक्रम चर्चेत होता. सेलिब्रिटी आणि त्यांच्या खासगी जीवनातील अनेक गोष्टी या कायमच चाहत्यांचं लक्ष वेधत असतात. विक्रम भट्टच्या जीवनात सध्या आलेलं हे वळण अशाच चर्चांना वाव देऊ जात आहे. मुख्य म्हणजे व्हायरल होणाऱी ही माहिती आणि फोटो पाहता आता तो या नात्याचा जाहीरपणे स्वीकार करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.