Bollywood Actresses Side Business : हल्लीच्या जगात एकाच वेळीस अनेक मार्गातून पैसे कमावले जातात. त्यामुळे आपल्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते. सध्या हाच प्रकार बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाहायला मिळतो. बॉलीवूड ही खूप मोठी इंडस्ट्री (Industry) आहे. त्यात होणाऱ्या लहान मोठ्या घडामोडी नेहमीच समोर येत असतात. अशा परिस्थितीत अनेक कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. त्याचबरोबर अनेक असे स्टार्स (Stars) देखील आहेत ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या कलेने  बॉलिवूड स्टार्सनी इंडस्ट्रीतून नाव आणि पैसा दोन्ही कमावले आहे. पण तरीही ते समाधानी नाहीत. अशा परिस्थितीत करोडोंची कमाई करणारे स्टार्सही अनेक साइड बिझनेस करत आहेत. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सच्या साइड बिझनेसबद्दल (Side Business) सांगणार आहोत. (bollywood famous actresses earn crores of rupees in Side Business you will be shocked nz)



1. दीपिका पदुकोण (Deepika Padukone)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिने तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. अभिनयासोबतच दीपिकाने फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँडही लॉन्च (Brand launch) केले आहेत. हा दीपिकाचा साईड बिझनेस आहे. ती तिच्या ब्रँडच्या कपड्यांचे प्रमोशन (Promotion) करताना दिसते. 



2. जुही चावला (Juhi Chawla)


जुही चावला हिनं एकेकाळी तिच्या अभिनयाने सगळ्यांनाच भूरळ पाडली होती. तिने आतापर्यंत सगळ्याच बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनयासोबतच जुही चावलाही आयपीएलमधील (IPL) कोलकाता नाइट रायडर्सची (Kolkata Knight Riders) संघ मालक आहे.


हे ही वाचा - Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये



3. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)


माधुरी दीक्षितने तिच्या सुप्रसिद्ध गाण्यांनी आणि चित्रपटांनी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. माधुरी दीक्षितला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धक धक गर्ल म्हणून ओळखले जाते. अभिनयाव्यतिरिक्त माधुरीची स्वतःची ऑनलाइन क्लास वेबसाइट आहे. त्याच वेळी, ती जीवनशैली आणि ब्रँडचे काम देखील हाताळत आहे.



4. प्रीती झिंटा (Preity Zinta)


प्रीती झिंटाने तिच्या अभिनयाने एक काळ गाजवला होता. प्रीती झिंटा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या चित्रपट जगत सोडून प्रिती झिंटा आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Xi Punjab) संघाची मालक बनली आहे. यामुळे प्रीतीने व्यावसायिक जगतात स्वत:ला सिद्ध केले आहे. 



5. ट्विंकल खन्ना (Twinkle khanna)


ट्विंकल खन्नाने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. पण तिची फिल्मी कारकीर्द फारशी चांगली राहिली नाही. फिल्मी दुनियेव्यतिरिक्त ट्विंकल एक चांगली लेखिका (author) देखील आहे, तिची पुस्तके लोकांना खूप आवडतात.



6. सुष्मिता सॅन (Sushmita sen)


सुष्मिता सेनने बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आहे. ती एका काळानंतर चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय दिसली नाही. पण हल्ली तिनं वेबसीरीजच्या (Web series) माध्यामातून पुन्हा अभिनय क्षेत्रात स्वत: चा ठसा उमटवत आहे. पण तिचे मुंबईत रेस्टॉरंट (Restaurants) आहे. हा तिचा साईड बिझनेस आहे. 



7. सोनम कपूर (Sonam Kapoor)


सोनम कपूर ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक चाहते तिला तिच्या फॅशनसाठी (Fashion) फॉलो देखील करतात. सोनम कपूरला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनयासोबतच तिने आपली बहीण रियासोबत स्वतःचा ब्रँडही लॉन्च (Brand launch) केला आहे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या स्टायलिश कपड्यांचे कलेक्शन आहे.