मुंबई : Coronavirusचा संसर्ग बळावत असतानाच काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्माते करिम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी आणि झोआ मोरानी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची बाब उघड झाली. आता मुलींमागोमाग करिम यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब उघड होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई मिरर'ला दिलेल्या माहितीत करिम यांचा भाऊ मोहम्मद मोरानीने याविषयीची माहिती दिली. हो करिम त्याच्या मुलींसोबतच होता. त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


करिम यांची मुलगी शजासुद्धा नानावटी रुग्णालयातच दाखल आहे. तर, त्यांची झोआ ही मुलगी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल आहे. ज्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरु आहेत. झोआने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राशी संवाद साधत सद्यस्थितीची माहिती दिली होती. 


'हो माझी चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मला कोरोना रुग्णांसाठीच्या खास विलगीकरण कक्षात नेण्यात आलं आहे. मला काही लक्षणं आढळून आल्यामुळे मी आणि शजाने कोरोनाची चाचणी करुन घेण्याचं ठरवलं. सावधगिरी म्हणून माझी दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. सध्याच्या घडीला अतिशय मोजक्या समानासह मी या कक्षात आहे. काही पुस्तकं मी सोबतीला घेतली आहेत. इथे कोणालाही मला भेटण्याची परवानगी नाही', असं ती म्हणाली होती. 


 


करिम यांच्या या दोन्ही मुलींनी परदेशी आणि देशांतर्गत प्रवास केल्याची माहिती उघड झाली आहे. प्रवास करुन परतल्यानंतर त्यांना ताप, डोकेदुखी वारंवार सतावू लागली होती. तेव्हाच त्यांनी दोघींनी घरातल्या घरातही स्वत:ला सर्वांपासून वेगळं केलं होतं.