मुंबई : फोटोमधील या चिमुकल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. त्याने बॅक टू बॅक 17 हिट चित्रपट दिलं आणि बॉक्स ऑफिसमध्ये गदर माजवला. अचानक मिळालेलं स्टारडम या अभिनेत्याला सांभाळता आलं नाही. बॉलिवूडमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत जे त्यांना मिळालेलं स्टारडम टिकवून ठेवतात. पण या अभिनेत्याला ते सांभाळता आलं नाही आणि मग...या फोटोमधील या अभिनेत्याला तुम्ही ओळखला का? खरं तर हा बॉलिवूड अभिनेता आज आपल्यामध्ये नाही. पण त्याचं कुटुंब बॉलिवूडमध्ये राज्य करते. नुकताच त्याचा जावयाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 


ओळखलं का या अभिनेत्याला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओळखलं का तुम्ही या अभिनेत्याला...या अभिनेत्याने 1965 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश घेतला. या अभिनेत्याला आपण काका म्हणून ओळखतो...राजेश खन्ना असं या अभिनेत्याच नाव आहे. IMD च्या रिपोर्टनुसार, राजेश खन्ना हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव नायक आहे ज्याच्या नावावर सर्वाधिक चित्रपट आणि कमी मल्टी स्टार कलाकारांमध्ये त्यांची गणना होते. बॉलिवूडमधील या अभिनेत्याच्या त्या काळातील स्टारडमचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. 'बहारों के सपने'  या चित्रपटानंतर दुखी Climax मुळे राजेश खन्ना संतापले होते. अखेर दिग्दर्शकाला चित्रपटाचा शेवट आनंदी करावा लागला होता.  (bollywood first superstar rajesh khanna childhood photo lost stardom )


पण हे यश...


राजेश खन्ना यांनी 1969 ते 1977 पर्यंत काळात सुपरस्टारचा टॅग एन्जॉय केला . पण बॉलिवूडमधील पहिला सुपरस्टार असणाऱ्या राजेश खन्नाला काही महिन्यांमध्ये सुपरस्टारचा टॅग अमिताभ बच्चन यांच्यासोबत शेअर करावा लागला. पण त्यानंतर अभिनेत्याची कारकीर्द उतरती कळा लागली. अभिनयानंतर त्यांनी निर्माता क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं त्यांनी  3 चित्रपट बनवले आणि 4 चित्रपटाची निर्मिती केली होती. पण घसरलेल्या स्टारडममुळे अभिनेता हळूहळू सिनेसृष्टीपासून दुरावत गेला. 



राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाशी लग्न केलं होतं. 31 वर्षांच्या राजेश खन्ना यांनी 16 वर्षांच्या डिंपल कपाडियाशी लग्न केलं. यांची पहिली भेट अहमदाबादच्या नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. तीन वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न केलं. पण त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम अंजू महेंद्रू होती असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. तर त्यांच्या अनिता अडवाणीसोबतच्या लिव्ह-इन-रिलेशनशिपचीही चर्चा रंगली होती.


राजेश आणि डिंपल यांना दोन मुली ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना. दोघांनीही चित्रपटात हात आजमावला पण यश मिळाले नाही. ट्विंकल खन्ना हे अक्षय कुमारशी लग्न केलं. अक्षयचा OMG 2 चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. विशेष म्हणजे अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर डिंपल कपाडियाने पुन्हा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आहे.