मुंबई : अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. आयेशा श्रॉफ यांनी अभिनेता साहिल खानविरोधात दाखल केलेले फसवणुकीबद्दलचे दोन एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले दोन्ही एफआयआर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने रद्द केले. साहिलवर लावण्यात आलेल्या चार कोटी रुपयांची फसवणूक आणि इतर आरोपांचा पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेतल्याचं श्रॉफ यांनी कोर्टाला सांगितलं.



दोन्ही पक्षांकडून परस्पर सहमतीने हा वाद मिटवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. असं असलं तरीही, खानला या प्रकरणात खर्चापोटी एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र बालकल्याण समितीकडे भरण्यास त्याला सांगण्यात आलं आहे. 'स्टाईल' या चित्रपटातील अभिनयामुळं साहिल खान हे नाव सर्वांसमोर आलं होतं. त्य़ानंतर बऱ्याच इतरही कारणांनी या अभिनेत्याचं नाव चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं.