मुंबई : कोरोना (Corona) लसीकरणासाठी (Vaccination) आता नागरिक मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत. झपाट्यानं पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरणाची मोठी मदत होते असा दावा शासन आणि आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आला आहे. पण, आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही हा कोरोना शिकार करु लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधून अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळत आहेत. त्यातच एका सेलिब्रिटी दिग्दर्शिकेचीही भर पडली आहे. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची पोस्ट तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. लसीचे दोन डोस घेऊनही आणि मुख्य म्हणजे दोन डोस घेतलेल्याच व्यक्तींच्या संपर्कात येऊनही आपल्याला कोरोना झाला. बहुधा आपण काळा टीक्का लावण्यास विसरलो असल्यामुळं असं झालं असावं अशी मिश्किल प्रतिक्रिया तिनं दिली आहे. 


काळा टीक्का आणि कोरोना यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, पण लसीकरण पूर्ण होऊनही आपल्याला कोरोना झाल्यामुळं तिनं उपरोधिकपणे ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षेच्या सर्व निकषांचं पालन करावं असं सांगणारी ही दिग्दर्शिका आहे, फराह खान (Farah Khan). 


Bigg Boss : दोघात तिसरा? राकेश बापटच्या खिशात सापडलेली दिव्या अग्रवालची 'ती' वस्तू पाहून शमिता भडकली 



'मै हूँ ना', 'ओम शांती ओम', 'हॅप्पी न्यू इयर' अशा चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या फराहनं शेअर केलेली ही पोस्ट सध्या 'टॉक ऑफ द टाऊन' ठरत आहे. 'झी कॉमेडी शो' या कार्यक्रमामध्ये फराह परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. हल्लीच ती अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यासह एका डान्स रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणासाठीही हजर होती. आपण विविध ठिकाणी विविध व्यक्तींसोबत उपस्थित असल्याची बाब जाणत फराहनं संपर्कात आलेल्यांच्या सुरक्षिततेपोटी त्यांनाही कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.