मुंबई : हिंदी कलाजगत अर्थात बॉलिवूड (Bollywood)मध्ये आजवर असंख्य चित्रपट साकारले गेले. अनेक कलाकारांनी या चंदेरी दुनियेत नशिब आजमावलं. काहींना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली, तर काहींना मात्र कालांतरानं माघार घ्यावी लागली. अशाच गर्दीत हरवलेल्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे रिमी सेन (Rimi Sen).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गोलमाल' (Golmal), 'धूम' 2 (Dhoom 2), 'हंगामा' (Hangama) या चित्रपटांतून रिमी प्रेक्षकांच्या भेटीला आली. सलमानसोबतही (Salman Khan) तिनं स्क्रीन शेअर केली. पण, सध्या मात्र ती कुठेच दिसेनाशी झालीये. चित्रपटांमध्ये मला फर्निचरसारख्याच भूमिका मिळाल्या होत्या, असं म्हणत तिनं मनातील खंत जाहीरपणे मांडली. (Bollywood golmal Fame actress rimi sen on getting secondary roles and recent photo)


मला जे मिळालं ते माझ्या वाट्याचं नव्हतंच. मी खूप सारे म्युझिक व्हिडीओ केले. आमिर खानसोबत एक जाहिरातही केली होती. यानंतर मी हंगामा चित्रपट केला, असं म्हणताना हा आपल्या नशीबाचाच भाग असल्याचं ती न विसरता म्हणाली. 


मला फक्त विनोदी चित्रपटच मिळत होते, अशी खंत बोलून दाखवत असताना त्या चित्रपटांमध्ये आपली भूमिका फर्निचरसारखीच होती असं लक्षवेधी वक्तव्य तिनं केलं. 'त्यावेळी चित्रपटसृष्टी पुरुषप्रधान होती. आज मात्र कथानक मध्यवर्ती भूमिकेत असतं. त्यावेळी या ठिकाणी एखादा अभिनेता होता. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं हे सारंकाही बदललं आहे', असं रिमी म्हणाली होती. 


2000 या वर्षी रिमीनं अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या रिमीनं बंगाली चित्रपट Paromitar Ek Din या चित्रपटात काम केलं होतं.  2003 मध्ये तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 'हंगामा' हा तिचा पहिला चित्रपट होता. चित्रपटाला चांगली लोकप्रियता मिळाली. पण, रिमीला मात्र यात फार लहानशीच भूमिका मिळाली होती. 




रिमी सध्या स्वत:वरच जास्त लक्ष देताना दिसते. तिच्या सोशल मीडिया पेजवरच्या अपडेट्स पाहिल्यास फिटनेसच्या बाबतीत ही अभिनेत्री बरीच सजग असल्याचं पाहायला मिळतं. पण, तिचा एकंदर लूक पाहता ही अभिनेत्री किती बदललीये अशीच प्रतिक्रिया तुम्हीही द्याल.