उर्वशी रौतेलाचा भर कार्यक्रमातील `तो` व्हिडिओ व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनयाच्या जोरावर वर्चस्व गाजवते
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनयाच्या जोरावर वर्चस्व गाजवते. आता या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ दुबईचा असून यामध्ये ती परफॉर्म करताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्वत: अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवरुन चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
बुर्ज अल अरबच्या टॉपवर परफॉर्मेंस
उर्वशी रौतेलाला एक्सपो 2020 पवेलियनमध्ये रॉयल आमंत्रण मिळालं. या कार्यक्रमात उर्वशी अतिशय सुंदर अंदाजात दिसत आहे. उर्वशीला या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर तिने जबरदस्त परफॉर्मेसदेखील दिला. एमिगाला पुरस्कार सोहळ्याला तिने हजेरी लावली होती. जगातील एकमेव सात सितारा हॉटेल बुर्ज अल अरबच्या टॉपवर नुकतंच तिने परफॉर्मेंन्स दिला. हे करत असताना उर्वशीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उर्वशीचा चित्रपट वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सिंग साहब द ग्रेट या चित्रपटाने अभिनेत्रीच्या प्रवासला सुरूवात झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र उर्वशीच्या अभिनयाचं कौतुक झालं. यानंतर तिने हनी सिंगसोबत लव्हडोस या व्हिडिओ अल्बममध्ये काम केलं. त्यानंतर ती सनम रे आणि ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटांमध्ये दिसली. 2018 मध्ये ती हेट स्टोरी 4 या चित्रपटात दिसली आणि 2019 मध्ये ती 'पागलपंती' चित्रपटात दिसली.