IIFA Utsavam 2024: आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार 2024 सुरू झाला आहे. हा सोहळा 3 दिवस चालणार आहे. 27 सप्टेंबरचा पहिला दिवस साउथ इंडस्ट्रीसाठी खास होता. IIFA उत्सव 2024 च्या पहिल्या दिवशी कन्नड ते तमिळ चित्रपटसृष्टीतील कलाकारांना सन्मानित करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबु धाबीमध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. IIFA पुरस्कारांचा पहिला दिवस तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांसाठी होता. शुक्रवारी झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत. सुपरहिट चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन-2' ला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. 


'पोन्नियिन सेल्वन-2' या चित्रपटाला प्रत्येकी पाच पुरस्कार मिळाले आहेत. माजी मिस वर्ल्ड बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं आहे. याशिवाय कोणत्या कलाकारांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत याची संपूर्ण यादी खाली दिलेली आहे. 


IIFA उत्सव 2024 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी


  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (तमिळ) - जेलर

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (तमिळ) - विक्रम (पोन्नियिन सेल्वन 2)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगु)- नानी (दसरा)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (तमिळ) - ऐश्वर्या राय (पोन्नियिन सेल्वन 2)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (तमिळ) - मणि रत्नम (पोन्नियिन सेल्वन 2)

  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (तमिळ) - एआर रहमान (पोन्नियिन सेल्वन 2)

  • नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी (तमिळ) - एसजे सूर्या (मार्क एंथनी)

  • नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी (तेलुगु) - शाइन टॉम चाको (दसरा)

  • सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका (मल्याळम) – अर्जुन राधाकृष्णन (कन्नूर स्क्वाड)

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (तमिळ) - जयराम (पोन्नियिन सेल्वन 2)

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (तमिळ) – सहसर श्री (चिट्ठा)

  • सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला (कन्नड) - आराधना राम (कातेरा)

  • कन्नड चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी - ऋषभ शेट्टी

  • भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी- चिरंजीवी

  • भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदान - प्रियदर्शन

  • भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट महिला - समंथा रुथ प्रभू

  • गोल्डन लेगसी अवॉर्ड- नंदामुरी बालकृष्ण


पहिल्या दिवशी राणा दग्गुबती आणि तेजा सज्जा यांनी IIFA उत्सवाचे आयोजन केले होते. आता आणखी दोन दिवस चालणाऱ्या IIFA उत्सवासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि विकी कौशल होस्ट करणार आहेत. हा उत्सव 29 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.