मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आर.के. स्टुडिओला विकण्याचा निर्णय काही महिनांपूर्वीच कपूर कुटुंबीयांकडून घेण्यात आला होता. खुद्द कपूर कुटुंबीयांकडूनच याची अधिकृत माहिती देण्यात आली. 
मुंबईच्या चेंबूर येथे विस्तीर्ण भूखंडावर असलेल्या या स्टुडिओला विकत घेण्याऱ्यांच्या नावांविषयीसुद्धा व्यवसाय आणि कलाविश्वात बऱ्याच चर्चा होत्या. त्याविषयीच आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टुडिओ विकण्याच्या निर्णयानंतर आता कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजसोबत याविषयीच्या व्यवहाराची चर्चा करत असल्याचं वृत्त डीएनएने प्रसिद्ध केलं आहे. 


शुक्रवारी कपूर कुटुंबीयांच्या वतीने एक नोटीस जारी करण्यात आली. ज्यामध्ये संबंधीत भूखंडाच्या विक्रीसाठीचं मुल्य निर्धारित करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिची देण्यात आली होती. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोदरेज प्रॉपर्टीजसोबतच्या व्यवहाराच्या चर्चा आता शेटवटच्या टप्प्यात असून, सर्व कपूर कुटुंबाकडे असणाऱ्या भूभागाच्या मालकी हक्कांच्या पडताळणीनंतर पुढील रितसर नोंदणी करण्यात येणार आहे. 


दरम्यान, कपूर कुटुंबीयांकडून मात्र संबंधीत व्यवहाराविषयी माहगिती देताना गोदरेजड प्रॉ़पर्टीजच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 


रणधीर कपूर यांनी डीएनएला दिलेल्या माहितीनुसार साधारण तीन, चार व्यक्तींशी या व्यवहाराविषयी बोलणी सुरु असून येत्या महिनाभरात सर्व गो स्पष्ट होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


काही महिन्यांपूर्वीत कपूर कुटुंबीयांनी ही वास्तू विकण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. स्टुडिओच्या देखभालीसाठी लागणारा खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न यात मोठी तफावत असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं कपूर बंधूंनी सांगितलं होतं. संपूर्ण कुटुंबासोबतच्या विचारपूर्वक चर्चेनंतरच हा निर्णय झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.