कतरिना कैफच्या लग्नात Ex Boyfriends लावणार हजेरी?
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.
मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान विकी आणि कॅट राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. कतरिना आणि विकीच्या लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांची यादी आता समोर आली आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. ७ ते ९ डिसेंबर दरम्यान हा लग्नसोहळा चालणार असल्याचं सांगण्यात येतय. या लग्नात करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी आणि कियारा अडवाणी यांसारखे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या लग्नाला कतरिनाचे एक्स बॉयफ्रेंड येणार नसल्याचं वृत्त आहे.
सलमान खान हा बॉलिवूडचा भाई आहे. ज्याने कतरिना कैफला बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवून दिला. सलमान आणि कतरिनाने बराच काळ एकत्र वेळ घालवला. पण आज दोघांचं नातं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. असं असूनही दोघांनीही एकमेकांबद्दल नेहमीच आदर राखला. दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. पण आता बातम्या येत आहेत की, कतरिनाच्या पाहुण्यांच्या यादीत सलमान खानचं नाव नाही. यामागचं कारण 'टायगर 3' चित्रपटाचं शूटिंग सांगितलं जात आहे. कतरिनाही 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे.
सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाचं नाव रणबीर कपूरसोबत जोडलं गेले. दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. कपूर कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कतरिनालाही अॅड केल्याची बातमी समोर आली होती. पण काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या. रणबीरपासून विभक्त झाल्यानंतर कतरिना बराच काळ सोशल मीडियापासून दूर होती, तिला यातून बाहेर यायला खूप वेळ लागला.
कतरिना कैफचं नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबतही जोडलं गेलं होतें. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. पण या नात्याचं सत्य काय आहे हे कोणालाच कळू शकलं नाही. सिद्धार्थ मल्होत्रा सध्या कियारा अडवाणीला डेट करत आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगलं आहे.
अहाना देओलनंतर आदित्य रॉय कपूरचं नाव कतरिना कैफसोबत जोडलं गेले. दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि काही काळानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी पसरली. कतरिनाच्या लग्नाला आदित्य येणार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, ब्रेकअपनंतर दोघेही 'फितूर' या चित्रपटात दिसले होते.
सिद्धार्थ मल्ल्याचं नाव दीपिका पदुकोण आणि कतरिना या दोघांसोबत जोडलं गेलं होतं. कतरिना आणि सिद्धार्थ मल्ल्या यांच्यात खास नातं असल्याचं मानलं जातं. दोघंही आयपीएलमध्ये अनेकदा एकत्र दिसले होते. कतरिना आणि विकी खूप दिवसांपासून एकत्र आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगलं आहे. 'एक था टायगर' चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्या घरी कॅट आणि विकीचा रोका सोहळा पार पडला.