Salman Khan Upcoming Movie : गेली कित्येक वर्ष सलमान खान ईदच्या दिवशी  नव्या सिनेमाची घोषणा करत त्याच्या चाहत्यांना ईदचे गिफ्ट देत असतो. या वर्षीही त्याने त्याच्या चाहत्यांना ईदचे गिफ्ट म्हणून नव्या सिनेमाची  घोषणा केली आहे. सलमानच्या या आगामी सिनेमाचं नाव सिकंदर असून 2025 मध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सलमानने आगामी सिनेमाची माहिती सोशलमीडियावरून दिली असून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सलमानचा फॅनफॉलोविंग जगभरात मोठ्या प्रमाणात असून ईदच्या दिवशी त्याचे चाहते त्याच्या नव्या सिनेमाची वाट पाहत असतात. त्याच्या या आगामी सिनेमात   मुख्य भुमिकेत कोणकोणते कलाकार असणार हे सध्या गुलदस्त्यात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 




काही दिवसांपूर्वी सलमानचा नव्या सिनेमाच्या चर्चा रंगत होत्या. मात्र त्याने सोशलमीडियावरुन दिलेल्या माहितीमुळे त्याचा नवा सिनेमा येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला. साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत सलमानने बऱ्याच सिनेमात काम केलं. जुड़वा, मुझसे शादी करोगी आणि किक यांसारख्या सुपरहिट सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. टायगर जिंदा है या सिनेमाच्या तीनही भागात कतरीना कॅफ आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. बॉलिवूडच्या दबंगने आजवर अनेक हिट सिनेमे दिले असून त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ईदच्या दिवशी नव्या सिनेमाची घोषणा करुन सलमान कायम त्याच्या चाहत्यांना खूष करत असतो. अशातच आता या वर्षीही त्याने सिकंदर या आगामी सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना खूष केलं आहे. त्याचा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


सिकंदर या सिनेमाच्या दिर्गदर्शनाची जबाबदारी  ए. आर. मुरुगादास यांच्यावर आहे. ए. आर. मुरुगादास यांनी हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम केलं असून अनेक हिट सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. गजनी, हॉलीडे : ए सोल्डर इस नेवर ऑफ ड्यूटी या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं असून प्रेक्षकांची आजही या सिनेमांना पसंती दर्शवतात. साजिद नाडियाडवाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते असून बाघी, हाऊसफुल, हिरोपंतीसारख्या सुपरहिट सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.