83 Movie Review : आम्ही जिंकण्यासाठीच आलोय... जगज्जेत्या भारतीय संघाची रोमहर्षक कहाणी
जितेगाssss जितेगाsss इंडिया जितेगाsss
मुंबई : आमच्या काळात... असं म्हणत तुमच्याही आजोबांनी, काकांनी, बाबांनी तुम्हाला एक कहाणी ऐकवलीच असेल. ही कहाणी होती भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्याची. एका अशक्य विजयाची. ही कहाणी होती परकीयांच्या देशात भारतीय तिरंगा उंचावण्याची आणि एकजुटीनं पेटून उठलेल्या संघर्षाची. ही कहाणी होती, '`83' विश्वचषकावर भारतीय क्रिकेट संघाचं नाव कोरलं जाण्याची.
इंटरनेटची सुविधा जन्मलेलीही नव्हती तेव्हाच एक अशी कामगिरीस आताच्या भाषेत सांगावं तर व्हायरल झाली होती, की विचारुन सोय नाही.
कबीर खाननं या '`83' या चित्रपटाच्या निमित्तानं एक अशी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली जिथं खरंच त्याचं कसब पाहिलं गेलं.
1983 मधील क्रिकेट संघातील खेळाडूंशी मिळतेदजुळते कलाकार निवडण्यापासून ते अगदी तो काळ रुपेरी पडद्यावर साकारण्यापर्यंक प्रत्येक पान त्यानं हळुवारपणे आणि तितक्याच समर्पकतेनं उलटलं.
आपला संघ विश्चवचषक जिंकण्यासाठीच दौऱ्यावर आला आहे अशी खुणगाठ बांधलेल्या कपिल देव यांच्या एका ध्यासावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
संघातील प्रत्येक खेळाडूशी जुळवून घेत, वेळ पडल्यास आपल्यात दडलेलं क्रिकेट कौशल्य दुसऱ्याला अवाक् करेल अशा पद्धतीनं समोर आणत आणि सोबतच एक साधेपणा जपत असणाऱ्या एका व्यक्तीला पाहून प्रेक्षक भारावून जातात.
ही व्यक्ती म्हणजे कपिल देव. रणवीर सिंगच्या वाट्याला आलेली ही भूमिका त्यानं तितक्याच ताकदीनं साकारली आहे.
जतिन सरना, साकिब सलीम, जीवा, एमी विर्क आणि हार्डी संधू यांच्या अभिनयानं रणवीरला चांगली साथ दिली आहे.
तत्कालीन क्रीडा पत्रकारिता, माध्यमं आणि मानसिकता चित्रपटातून अचूकपणे साकारली गेली आहे.
चित्रपट पाहताना एका महान खेळाडूनं खरंच भारतीय संघ विश्वचषक जिंकू नये यासाठी प्रयत्न केला होता का, असा प्रश्न उपस्थित होतो.
हा खेळाडू नेमका कोण हे चित्रपट पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे.