मुंबई : दिग्दर्शक तिग्मांशू धुलियाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री माही गिल आणि दिग्दर्शक सोहम शाहसुद्धा दिसत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून ते सारेच चित्रीकरणादरम्यानच्या एका निराशाजनक अनुभवाचं कथन करत आहेत. घोडबंदर रोड येथे घडलेल्या घटनेविषयी ते माहिती देत आहेत. शिवाय पोलिसांची एकंदर भूमिका पाहता तेच खरे गुंड असल्याची संतप्त प्रतिक्रिया माहीने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका फॅक्टरीमध्ये वेब सीरिजचं चित्रीकरण करत असताना काही गुंड त्या ठिकाणी आले. फॅक्टरीमध्ये चित्रीकरण करण्यासाठी योग्य ते भाडं वगैरेही देण्यात होतं. पण, तरीही या गुंडांनी त्यावेळी उच्छाद घालण्यास सुरुवात केली, शिवीगाळ केली अशी माहिती या व्हिडिओद्वारे समोर येत आहे. 


'सकाळी चार साडेचार वाजण्याच्या सुमारास काही गुंड हातात काठ्या आणि लोखंडी सळ्या घेऊन आले. त्यांनी आमच्या टीममधील तांत्रिक काम करणाऱ्यांना मारहाण केली. ही जागा आमची आहे, इथे अजिबात चित्रीकरण करता येणार नाही असं सांगत त्यांनी महिलांवरही हात उचलला', असं ते म्हणत आहेत. यावेळी माहीनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 



मुख्य म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांचं सहकार्य न मिळाल्याबद्दल त्याने निराशा व्यक्त केली आहे. 'पोलिसांनीही गुंडांचीच बाजू घेतली. पोलिसांनीही यावेळी कंपाऊंडचं दार बंद करत पैसे पोहोचवा, कोर्टात या आणि पंचनामा करुन सामान घेून जा अशी ताकिद दिली', असं तो म्हणाला. सध्याच्या घडीला कोणतीही कायदेशीर कारवाई आणि न्यायालयीन फेऱ्या होऊ नयेत यासाठी आपण तक्रार न करण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगत आरोपी मोकाट सुटणारच असल्याची वस्तुस्थिती या सर्व कलाकारांनी मांडली. 


ही कलाकारांची आणि कलाविश्वाची एक प्रकारची छळवणूकच आहे अशीच प्रतिक्रिया धुलिया आणि इतर कलाकारांनी गिली. 'आज ज्या गोष्टींचा सामना आम्ही केला त्याच गोष्टींचा सामना इतर कोणालाही करावा लागू शकतो', असं म्हणत माही गिल हीने तीव्र संताप व्यक्त केला.