मुंबई : 'इंदु सरकार' हा हिंदी चित्रपट सर्वोच्च न्यायालय आणि दिल्लीतील उच्च न्यायालयाने २८ जुलैला रिलीज करण्याची परवानगी दिलीय. त्यामुळे आज हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने या चित्रपटाला हिरवा झेंडा देत स्त्री याचिकेचा अर्ज फेटाळून लावला. याचिकाकर्त्या प्रिया पॉल नावाच्या महिलेनं दिवंगत संजय गांधी यांची जैविक मुलगी असल्याचा दावा करत, या सिनेमाच्या प्रदर्शनाला हरकत घेतली होती. तीन न्यायाधीश आणि न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीवर आधारीत आहे. 


कायद्याच्या कक्षेत या चित्रपटाकडे 'कलात्मक अभिव्यक्ती' म्हणून पाहावं लागेल त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होईल असं म्हणत या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यावर बंदीची मागणी करणारे सर्व अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलेत.


कुणीही गांधी कुटुंबीयांच्या नावावर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करू शकत नाही. प्रिया पॉल या गांधी कुटुंबाशी संबंध स्पष्ट होऊ शकला नाही. मृतकाच्या कुटुंबीयांनी (गांधी कुटुंब) या सिनेमाविरुद्ध हरकत घेतली तरच त्यावर विचार केला जाऊ शकेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.


दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा झेंडा मिळाल्यानंतर, दिग्दर्शिक मधुर भांडारकर यांनी आनंद व्यक्त केलाय.