मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच नव्या कलाकारांनी प्रवेश करत आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यातच आता आणखी एक नाव जोडलं जात आहे. ते म्हणजे आयुष शर्माचं. सलमान खानच्या बहिणीचा पती आयुष शर्मा 'लवयात्री' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून, ते पाहता नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याचाच विचार मनात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ढोलिडा' असे बोल असणाऱ्या या गाण्याची चाल आणि त्यात पाहायला मिळणारं रास गरब्याचं नृत्य तुम्हालाही त्या तालावर थिरकायला भाग पाडेल असंच आहे. 



पलक मुछाल, नेहा कक्डड, उदित नारायण आणि राजा हसन यांनी गायलेल्या या गाण्याला तनिष्क बागचीने संगीत दिलं आहे. शबीर अहमदने हिंदी आणि गुजराती या दोन्ही भाषा वापरत सुरेखपणे हे गाणं लिहिलं आहे. 


५ ऑक्टोबरला 'लवयात्री' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यातून आयुष शर्मा, वरिना हुसैन हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नवरात्रोत्सव, त्यादरम्यानचा उत्साह आणि त्याच काळात खुलणारी प्रेमकहाणी या चित्रपटांच्या निमित्ताने पाहता येणार आहे. तेव्हा आता आयुष आणि वरिनाची केमिस्ट्री आणि त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीच उतरतो का, हे पाहणं औत्सुक्यचं ठरणार आहे.