मुंबई : अमेझॉन प्राइम व्हिडिओने बुधवारी जगप्रसिद्ध गणितज्ज्ञांच्‍या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित अशा आत्‍मचरित्रपर चित्रपट Shakuntala Devi  'शकुंतला देवी'चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अभिनेत्री विद्या बालन ही चित्रपटात मध्यवर्ती म्हणजेच शकुंतला देवी हे पात्र साकारत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शकुंतला देवी या अविश्‍वसनीयरित्‍या क्लिष्‍ट गणितं जलदपणे सोडवण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतेसाठी 'मानवी संगणक' म्‍हणून ओळखल्‍या जात होत्या. गतकाळात एक प्रतिष्ठीत महिला म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आपल्या अटीवरव  जीवन जगण्याला त्यांनी कायमच प्राधान्य दिलं आणि बऱ्या अंशी ते साध्यही केलं. याच सर्व गोष्टींची झलक आणि सहाजिकत खूप सारी आकडेमोड या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. 


सहसा गणित किंवा आकडेमोड म्हटलं की, अनेकांच्याच चेहऱ्याचा रंग उडतो. पण, शकुंतला देवी यांच्या जीवनात खरे रंग याच आकडेमोडीमुळं भरले जातात हे ट्रेलर पाहताना लक्षात येतं. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स प्रॉडक्‍शन्‍स व विक्रम मल्‍होत्रा (एबंडंशिया एंटरटेन्‍मेंट) यांनी केली आहे. विद्या बालन हिच्यासह जीशू सेनगुप्‍ता आणि अमित सध हे कालाकारही या चित्रपटातून झळकणार आहेत. 



लॉकडाऊन आणि कोरोनामुळं ठप्प झालेले अनेक व्यवहार पाहता 'शकुंतला देवी' हा चित्रपटही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुनच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट ३१ जुलै २०२० ला प्रदर्शित होणार आहे.