मुंबई : Tanhaji: The Unsung Warrior हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याचा काळ लोटला तरीही बॉक्स ऑफिसवर मात्र त्याचीचट चर्चा सुरु आहे. फक्त चर्चाच सुरु नाही, तर चित्रपटाला प्रेक्षक तितकेच भरभरुन प्रतिसादही देत आहेत. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीपासूनच मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम अद्यापही सुरुच आहे. प्रदर्शनानांतरच्या १५व्या दिवसांपर्यंत २०० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार करणारा हा चित्रपट बी- टाऊनमधील इतर चित्रपटांवर खऱ्या अर्थआने मात करुन गेला असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तान्हाजी[च्या कमाईचे सातत्याने उंचावणारे आकडे पाहता, आता अजय देवगनची मध्यवर्ती भूमिका असणारा हा चित्रपट शाहिद कपूर स्टारर 'कबीर सिंग'लाही कमाईच्या बाबतीत हतबल करताना दिसत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार भारतात हा चित्रपट कमाईच्या बाबतील 'कबीर सिंग'ला मागे टाकू शकतो. 


जिथे 'तान्हाजी'च्या पुढे दीपिकाचा 'छपाक' हा चित्रपटही तग धरु शकला नाही, तिथे आता 'कबीर सिंग' एकाकी झुंज देतो का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल. अजयच्या चित्रपटामागोमाग प्रदर्शित झालेल्या 'पंगा', 'स्ट्रीट डान्सर ३डी', 'मलंग' आणि 'जवानी जानेमन' या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत दणका बसला. 


Oscars 2020 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी 



सध्याच्या घडीला 'कबीर सिंग'च्या २७६.३४ कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडण्यासाठी 'तान्हाजीला अवघ्या ९.४६ कोटींचा गल्ला जमवण्याची गरज आहे. या चित्रपटाला असणारी एकंदर लोकप्रियता पाहता हा टप्पाही तान्हाजी सहज सर करेल अशीच अनेकांना आशा आहे. तेव्हा आता या चित्रपटाच्या आणखी एका विक्रमी कामगिरीवर कलारसिकांची नजर आहे. अजय देवगन, काजोल, सैफ अली खान यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने हा टप्पा ओलांडल्यास 'तान्हाजी' चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला जाणार आहे.