मुंबई : अजय देवगन, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे, सैफ अली खान आणि इतरही कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी' या चित्रपटासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी अर्थातच चित्रपटाच्या कमाईशी संबंधित आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून Tanhaji The Unsung Warrior  'तान्हाजी'च्या कमाईचे आकडे ज्या वेगाने पुढे जात आहेत, हे पाहता आता अनेकांनाच त्याचा हेवा वाटू लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर दिवशी एक नवा टप्पा ओलांडणाऱ्या या ऐतिहासिक पटाने आता आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी गुरुवारी ट्विट करत 'तान्हाजी'च्या कमाईचे नवे आकडे सर्वांसमोर आणले. शंभर कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आता 'तान्हाजी'चाही समावेश झाला आहे. 


सहाव्या दिवशी ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाने १६.७२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. परिणामी तान्हाजीच्या कमाईचे आतापर्यंतचे आकडे हे शंभर कोटींच्या पार पोहोचले. सध्याच्या घडीला हाती असणाऱ्या माहितीनुसार अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने १०७.६८ कोटींची कमाई केली आहे. 




VIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज


भारतात  box officeवर या चित्रपटाला मिळालेला एकंदर प्रतिसाद पाहता येत्या काळातही कमाईचे हे आकडे आणखी किती उंची गाठणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, 'तान्हाजी' चांगली कामगिरी करत असतानाच अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या 'छपाक' या चित्रपटाच्या कमाईचा वेग मात्र चांगलाच मंदावला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट आतापर्यंत फक्त २६.५३ कोटी इतकीच कमाई करु शकला आहे.