बी-टाऊनची आणखी एक अभिनेत्री देणार गोड बातमी
आरजे सोबत बांधलेली लग्नगाठ...
मुंबई : एकिकडे बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वारे वाहत असतानाच दुसरीकडे अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनात नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली आहे. मराठी कलाविश्वातील कलाकाराही याला अपवाद ठरलेले नाहीत. यातच आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.
काही मोजक्या पण तितक्यात गाजलेल्या चित्रपटांतून झळकलेली ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या आजही पसंतीस उतरते. लवकरच नव्या पाहुण्याचं स्वागत करणारी ही अभिनेत्री आहे अमृता राव. आरजे आनमोल याच्यासह काही वर्षांपूर्वीच लग्नगाठ बांधल्यानंतर आता ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी तयार झाली आहे.
मुख्य म्हणजे अद्यापही या जोडीनं ही बातमी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण, सोशल मीडियावर बेबी बम्पसह अमृताचा एक फोटो व्हायरल झाला आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. जवळपास ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अमृता आणि अनमोलनं लग्नगाठ बांधली होती.
२०१६ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली. माध्यमांतील वृत्तानुसार सध्या त्या़ंना कोणतीही बाब जाहीर करायची नसून ठराविक व्यक्तींपुरताच सीमित ठेवायची आहे. बहुधा याची कारणामुळं त्यांनी ही गोड बातमी सोशल मीडियावरही शेअर केलेली दिसत नाही. असं असलं तरीही चाहत्यांनी मात्र त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.