मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी किती महत्त्वाची आहेत हे आपल्या सर्वांनाचं माहित आहे. एका गाण्यामुळे चित्रपट सुपरहिट होतो. असे बरेच चित्रपट आहेत, जे चाहते गाण्यांमुळे सिनेमा ओळखतात, मग हम आपके हे कौन, चांदनी, विवाह अशा सिनेमातील गाणी सिनेमाला चार चांद लावतात. पण प्रत्येक गाण्यामागे एक किस्सा असतो. 1987 साली अनिल कपूर, अमरीश पुरी आणि श्रीदेवी यांचा 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट तुम्हाला आठवतच असेल, चाहत्यांना या चित्रपटांनं जेवढं वेड लावलं तेवढीच या चित्रपटातील गाणीही हिट झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातील 'हवा हवा हावाई' हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की, आजही चाहत्यांना ते गाणं तेवढंच आवडतं. श्रीदेवी यांना या गाण्यानंतर मिस हवा हवाई या नावाने ओळख मिळाली. पण तुम्हाला या गाण्यामागची कहाणी माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला या गाण्यामागील एक किस्सा सांगणार आहोत.


कविता नव्हत्या गाण्याची पहिली पसंत
मिस्टर इंडिया चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या जोडीने संगीत दिलं. 'हवा हवाई' गाणं कविता कृष्णमूर्तीं यांनी गायलं. हे गाणं त्यावेळी खूपच गाजलं. या गाण्यासाठी कविता यांचं कायम कौतुक केलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का? की कविता या गाण्यासाठी कधीच पहिल्या पसंत नव्हत्या, स्वत: कविता यांनी अनेकवेळा हा खुलासा केला आहे.


मुळात, या चित्रपटाच्या संगीतकारांनी कविता यांच्याकडून हे गाणं कच्च्या स्वरुपात गाऊन घेतलं होतं. पण कविताने भरपूर कष्ट घेवून हे गाणं गायलं. याचा परिणाम असा झाला की जेव्हा प्यारेलाल यांनी कवितांच्या आवाजात हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना हे गाणं फार आवडलं आणि त्यांनी तेच गाणं चित्रपटात ठेवलं. एकदा कविता म्हणाल्या होत्या की कदाचित अगोदर हे गाणं आशाजी गाणार होत्या.


कविता यांनी हे गाणं चुकीचं गायलं
खरं तर, कविता यांनी या गाण्यात जानूच्या जागी जीनू हा शब्द उच्चारला होता, पण हे गाणं ऐकल्यानंतर  लक्ष्मीकांत यांनी कविता यांना हे गाणं त्यांच्याच आवाजात चित्रपटातच राहिल याची गोड बातमी दिली.
 याचबरोबर कविता यांना सांगण्यात आलं की, त्या पुन्हा हे गाणं गाणार आहेत, कारण गाणं गाताना त्यांनी एक चूक केली होती. गाणं गाताना कविता यांनी एक चुकीचा शब्द उच्चारला होता. त्याबद्दल कविता यांना सांगितलं गेलं होतं.


कविता यांनी जानूच्या जागी जीनू हा शब्द उच्चारला होता. चुकीचा शब्द उच्चारल्यानंतर त्यांनी लगेच पुढच्या रेकॉर्डींगमध्ये ही चूक सुधारली आणि जानू हा शब्द उच्चारला, पण ही चूक अजूनही त्यांच्या गाण्यांमध्ये तशीच आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केलं होतं. या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले असून संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलं होतं.