अनाथ मुलीला आपलंसं करण्याची प्रियांकाची इच्छा, आईचा मात्र कडाडून विरोध
अनेकदा तिनं विविध कारणांनी आपल्या भेटीला आलेल्या या लहानग्यांना मायेनं जवळ केलं आहे
मुंबई : यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, निक जोनास या जोडीनं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचं पालकत्वं स्वीकारलं. लेकिच्या येण्यानं प्रियांच्या जीनवनात एक नवी पहाट झाली. तिनं एका नव्या भूमिकेत स्वत:ला झोकून दिलं. (Priyanka chopra nick jonas)
लहान मुलांचा प्रियांकाला विशेष लळा. ही बाब काही नवी नाही. कारण, अनेकदा तिनं विविध कारणांनी आपल्या भेटीला आलेल्या या लहानग्यांना मायेनं जवळ केलं आहे. (Priyanka chopra daughter )
प्रियांकाच्या आयुष्यात अशीच एक मुलगी आली होती, जी निराधार होती... फार कमी वयातच तिला कुणीतरी सोडून गेलं होतं. पण, आईच्या नकारामुळं त्या मुलीला चोप्रा कुटुंबासोबत ठेवता आलं नाही.
खुद्द प्रियांकानंच त्या प्रसंगाचा उलगडा केला. एके रात्री जाग आली तेव्हा आपल्या घरात बरीच चर्चा सुरु असल्याचं प्रियांकानं पाहिलं. त्यावेळीच तिच्या भावाचा जन्म झाला होता. प्रियांकाची आजी तिच्या आईसोबत काहीतरी बोलत होती, तर तिच्या आईच्या हातात एक बाळ होतं. (Priyanka chopra daughter name)
आईनं सांगितल्यानुसार, रुग्णालयात एका महिलेची प्रसूतीनंतर जेव्हा ती घरी येण्यासाठी कारमध्ये बसली तेव्हा तिनं एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. प्रियांकाच्या आईला धक्काच बसला. कारण, कोणीतरी भर पावसात नवजात बालकाला कारखाली ठेवून गेलं होतं. (Priyanka chopra mother madhu chopra )
आईनं त्या मुलीला आपल्यासोब ठेवून घ्यावं असं प्रियांकाला वाटत होतं. पण, तसं शक्य नसल्याचं तिच्या आईनं स्पष्ट सांगितलं. त्यावेळी प्रियांकाच्या आईनं एका निपुत्रीक जोडीला त्या मुलीला देण्याचा निर्णय़ घेतला. मुलीला पाहून त्या जोडप्याला झालेला आनंद प्रियांका आजही विसरु शकलेली नाही.
मुलगी दत्तक घेण्यासाठीही काही कायदेशीर अटींची पूर्तता करणं गरजेचं असतं, याची प्रियांकाला त्यावेळी काहीच कल्पना नव्हती. पण, आज अनेक वर्षांनंतर त्याच प्रियांकानं मातृत्त्वासाठी एक वेगळी वाट निवडली आणि तिच्या या निर्णयाचं सर्वांनी तोंड भरुन कौतुक केलं.