Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आता आयुष्यभराची साथ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रेमाच्या नात्याची अतिशय सुरेख सुरुवात करत असताना सर्वच बाजूंनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंब म्हणू नका, मित्रपरिवार म्हणू नका किंवा मग चाहते म्हणू नका प्रत्येकजण या जोडीला पाहून भावूक होत आहे. इतकंच काय तर कधी एकेकाळी जेव्हा रणबीर त्याच्या गर्लफ्रेंड्ससाठी जिचे कपडे चोरत होता तिनंही आलियाचं कौतुक केलं आहे. 


अर्थात तेव्हा रणबीर हे सर्व ज्यांच्यासाठी करत होता त्यामध्ये आलियाचा समावेश नव्हता. पण, तो जिचे कपडे चोरत होता ती व्यक्ती आजही त्याच्या संपर्कात आहे आणि अर्थात ती त्याच्या अतिशय जवळची व्यक्ती आहे. 


ही व्यक्ती म्हणजे खुद्द रणबीरची बहीण रिद्धीमा कपूर साहनी. एका कार्यक्रमादरम्यान रिद्धीमानं रणबीर तिचे कपडे चोरत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. (Riddhima kapoor shahni)


रिद्धीमा परदेशात शिक्षणासाठी असायची. पण, एक वेळ अशी आली जेव्हा ती सुट्टीसाठी घरी आली होती आणि तिथं त्याचवेळी रणबीरची एक मैत्रीण/ गर्लफ्रेंड आली. 


तिनं जसे कपडे घातले होते तसेच आपल्याकडेही असल्याचं तिच्या लगेचच लक्षात आलं. तेव्हा रिद्धीमाच्या लक्षात आलं की, पैशांचा अवाजवी खर्च नको म्हणून बहुतेक रणबीरच आपले कपडे चोरून त्याच्या गर्लफ्रेंड्सना देत असावा... 



भावाकडून झालेल्या या चुकीला रिद्धीमानं हसत हसत माफ केलं आणि आज जेव्हा तो एका नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे तेव्हा ती वारंवार आपल्या वहिनीचं म्हणजेच आलियाकं कोडकौतुक करताना दिसत आहे. 


भाऊ- बहिणीच्या नात्यातील हाच ओलावा सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे.