मुंबई : भारतीय कलाविश्वात दररोज असंख्य कलाकार मंडळी त्यांची अशी नवी ओळख प्रस्थापित करण्यासाठी येतात. अनेकजण यात यशस्वी ठरतात, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. काही कलाकारांना त्यांच्या कामाच्या सुरुवातीच्याच टप्प्यापासून यश मिळू लागतं, तर काहींचा यात थोडा जास्त वेळ दवडला जातो. पण, सरतेशेवटी आपल्या वाट्याला येणारं यश, मग ते अगदी लवकर असो किंवा उशिरा, ते आनंद मात्र तितकाच देऊन जातं. असाच आनंद सध्या रॅपर बाहशाहच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बादशाहने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेलं एक छायाचित्र पाहून असं प्रतित होत आहे की त्याचा आनंद खरंच गगनात मावेनासा झाला आहे. पंजाबी आणि हिंदी कलाविश्वात एक वेगळी ओळख निर्माण करत रॅप साँगच्या बळावर मोठा झालेला हा बादशाहा आता एका वेगळ्या वळणावर आला आहे, जेथून मागे वळून पाहिलं असता त्याला आपण किती दूरची वाट चालत आलो आहोत, हे लक्षात येत आहे. 'हा प्रवास खूप मोठा होता..... दूरचा होता... तुझं कुटुंबात स्वागत आहे', असं कॅप्शन लिहित बाहशाहने त्याच्या कुटुंबातील नव्या आणि खऱ्या अर्थाने मौल्यवान सदस्याची ओळख करुन दिली आहे. ही सदस्य आहे आलिशान 'रोल्स रॉयस व्रेथ' Rolls Royce Wraith. सध्याच्या घडीला भारतात या आलिशान गाडीची किंमत ६.४६ कोटींच्या घरात आहे. 



सुरुवातीपासूनच Rolls Royceच्या आलिशान गाड्या या श्रीमंतीचं एक प्रतिक म्हणूनही ओळखल्या जातात. त्यातही आता बादशाहने ही नवी पाहुणी आपल्या कुटुंबात आणली आहे, म्हटल्यावर चर्चा तर होणारच. Wraith विषयी सांगावं तर 'Wraith is a motor car for those with an insatiable thirst for adventure' अशी सरळ आणि सोप्या भाषेतील ओळख खुद्द रोल्स रॉयसच्या अधिकृत संकेतस्थळाकड़ून करण्यात आली आहे. 


बादशाहने त्याच्या या नव्या Rolls Royce Wraithचं छायाचित्र पोस्ट केल्यानंतर कलाविश्वातील सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट करत बादशाहचं अभिनंदन केलं. त्याला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये अभिनेता रणवीर सिंगचाही समावेश होता. रणवीरने राजाच्या मुकुटाची चिन्हं पोस्ट करत त्याचं अभिनंदन केलं, ज्याचे आभार मानत 'अपना टाईन आ गया..... ', असं बाहशाहने लिहिलं. त्याची ही आभार मानण्याची शैली आणि करिअरमध्ये आलेलं वळण पाहता हे उदगार खरंच त्याने सार्थ ठरवले आहेत, असं म्हणायला हरकत नाही.