मुंबई : गेल्यावर्षी ऍमेझॉन जंगलाला लागलेल्या भीषण आगीनंतर ऑस्ट्रेलियातील जंगलात ४ महिन्यांपासून आग धगधगत आहे. या आगीमध्ये सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले आहे. तसेच या आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रौद्र रूप धारण केलेल्या या आगीमुळे १ हजार ३०० पेक्षा जास्त घरं नष्ट झाली आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार २०१७ च्या आधीपासून ऑस्ट्रेलिया दुष्काळाचा सामना करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियात सध्या भीतीचे वातावरण आहे. सध्या आगीतून प्राण्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर या आगीमुळे निसर्गाचे देखील मोठे नुकसान झाले आहेत. देशातील परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. १३ जानेवारीपासून ते ४ दिवस भारत दोऱ्यावर येणार होते.


या आगीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदना देखील व्यक्त करत आहेत. अशा परिस्थित बॉलिवूडकरांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत. 


अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री दिया मिर्झाने ऑस्ट्रेलियाच्या आगीवर इन्स्टाग्रामच्या  माध्यमातून संवेदना व्यक्त केली आहे. 'ऑस्ट्रेलियामध्ये बुशफायर्सची आग देशाला डिसेंबर महिन्यापासून जाळत आहे. त्यामुळे देशातील हवेचा दर्जा खालावला आहे.'



तर दुसरीकडे अभिनेत्री दिया मिर्झाने आपलं मत इन्स्टाग्रामच्या मध्यमातून व्यक्त केलं आहे. 'जे होत आहे ते थांबलं पाहिजे. आपण ही परिस्थिती थांबवू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येवून पर्यावरणाचे संवर्धण करायला हवं आहे.' 



अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या या वणव्यात जंगलांची प्रचंड हानी झाली आहे. स्थानिक लोकांनाही याची झळ बसली आहे. आतापर्यंत या आगीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर हजारो हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले आहे.