हैदराबाद : एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हैराबादच्या सायबराबाद स्टेशन पोलिसांनी चार आरोपींना पकडल्याचा दावा केलाय. सोशल मीडीयावर त्याचप्रमाणे रस्त्यांवर उतरून याप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर कलाकारंनी देखील याप्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय, या नराधमांना कठोर शिक्षा होण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडला ७ वर्ष पूर्ण होतायेत. काहीशी तशीच आणखी एक हादरवणारी घटना हैदराबादमध्ये घडलीय. यावर अभिनेता अक्षय कुमार, फरहान अख्तर अभिनेत्री शबाना आजमी यांनी ट्विट केलं आहे. 



'तो हैदराबादमध्ये बलात्कार असूदे, तामिळनाडूमध्ये झालेला बलात्कार नाहीतर रांचीमधील वकिलीचा अभ्यास करणाऱ्या मुलीचा बलात्कार एक समाज म्हणून हे आपलं अपयश आहे. निर्भया प्रकरणाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे कुठोतरी थांबल पाहिजे' असे वक्तव्य अभिनेता अक्षय कुमारने केलं. 



'त्या नराधमांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे. मला पीडित महिलेच्या कुटुंबाच फार वाईट वाटत आहे. आपल्या समाजातील काही भागांना काय झालं आहे?' असा प्रश्न अभिनेत्री शबाना आजमी यांनी उपस्थित केला. 



२२ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर रस्त्याच्या कडेलाच तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावरून असं सिद्ध होत आहे की देशात कोणत्याच भागात महिला सुरक्षित नाहीत.