Bollywood Actor Who Carries Sanitary Pad with Him : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट हा फुकरे या चित्रपटासाठी ओळखला जातो. पुलकित सम्राट हा सोशल मीडियावर सक्रिय असून गर्लफ्रेंड क्रिती खरबंदासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्या दोघांमध्ये असलेल्या प्रेमाकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यात आता ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट नाही तर क्रितीनं पुलकितविषयी केलेला एक धक्कादायक खुलासा आहे. क्रितीनं खुलासा केला की पुलकित हा नेहमीच त्याच्यासोबत सॅनिटरी पॅड ठेवतो. त्याचं कारण देखीलन तिनं सांगितलं आहे. इतकंच नाही तर मासिक पाळी बाबत ती तिच्या वडिलांसमोर आणि भावासमोर किती मोकळेपणानं बोलू शकते याविषयी सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रितीनं काही दिवसांपूर्वी Hauterrfly ला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत क्रिती बोलताना दिसते की 'तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच पुलकित हा नेहमी त्याच्यासोबत सॅनिटरी पॅड घेऊन फिरतो. याविषयी बोलताना कृती पुढे म्हणाली की जेव्हा मी पुलकितला भेटली होती, तेव्हा आम्ही मित्र देखील नव्हतो. आम्ही फक्त सहकलाकार होतो. मला अजून आठवणं आहे की मला मासिक पाळी आली आणि तो एक आहे जो नेहमीच त्याच्यासोबत सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन घेऊन फिरतो.' 



पुढे क्रिती म्हणाली की 'पुलकित फक्त तिच्यासाठी नाही तर घरातील इतर महिलांसाठी देखील सॅनिटरी पॅड स्वत: सोबत घेऊन फिरतो. मला त्याच्यात असलेली ही गोष्ट खूप जास्त आवडते कारण या विषयावर त्याचे इतके चांगले विचार असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे म्हणून ही गोष्ट बोलते असं नाही तर ही गोष्ट मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी माझ्या लक्षात आली होती. '


हेही वाचा : 'मला म्हणाले तुझं लग्न वर्षभरही टिकणार नाही'; 14 वर्षांच्या सुखी संसारानंतर जितेंद्र जोशी म्हणतो 'मला त्या सर्वांबद्दल... '


क्रिती याविषयी बोलताना पुढे म्हणाली की, ती तिच्या भावासमोर आणि वडिलांसमोर मासिक पाळीवर बोलताना लाजत नाही किंवा घाबरत नाही. तिनं सांगितलं की तिचा भाऊ जेव्हा लहाण होता तेव्हा त्याला सॅनिटरी पॅडविषयी माहित नव्हतं. पण जेव्हा तो थोडा मोठा झाला तेव्हा क्रिती आणि तिची बहीण त्याला मेडिकलमधून सॅनिटरी पॅड आणायला पाठवायचे. क्रितीनं पुढे सांगितलं की तिच्या वडिलांना सुरुवातीला कसं तरी वाटतं होतं पण आईनं असं वातावरण तयार केलं की आमचं वडील स्वत: सॅनिटरी पॅड आणायचे आणि आमच्या हातात द्यायचे.