बिग बॉस 16 साठी Salman Khan घेणार इतके कोटी, आकडा एकूण धक्का बसेल
चित्रपट सोडाच..., बिग बॉसच्या 16 व्या सीझनमधून सलमान इतके कोटी कमवणार, सीझनची फी एकून थक्क व्हाल
मुंबई : बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉसच्या 16 व्या सीझनमुळे चर्चेत आहे. या सीझनमध्ये बिग बॉसचं घर अॅक्वा थीम असणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोवर या सीझनसाठी सलमान खानच्या फीबाबतही एक नवीन अपडेट समोर आले आहे. ही नवीन अपडेट जाणून घेऊयात.
बिग बॉस 16 च्या मंचावर पुन्हा एकदा सलमान खान स्पर्धकांच्या धमाल-मस्तीसह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सलमान खानला बिग बॉस 16 होस्ट करण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याची माहिती आहे. समीक्षक आणि ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी सलमान खानचं बिग बॉस 16 साठी 800 कोटीचा करार झाल्याचं त्यांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने बिग बॉस 16 साठी 1050 कोटींची मागणी केली आहे. मात्र, आता समोर आलेल्या ताज्या अहवालात हा करार 800 कोटींमध्ये झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान बिग बॉस 15 बद्दल बोलायचे झाले तर या सीझनसाठी सलमान खानला 350 कोटी रुपये देण्यात आले होते.