मुंबई : मुलगा आर्यन खान, याला एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलं आणि यानंतर त्याच्यामागे कारागृहाचाच फेरा लागला. मुलाच्या अडचणी दिवसागणिक वाढत जात असतानाच शाहरुखही बेचैन झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 25 दिवसांनंतर शाहरुखच्या मुलाला जामीन मंजूर झाला आणि तो घरी परतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारागृहात राहिल्यामुळे याचा आर्यनच्या मानसिकतेवरही याचे परिणाम झाले. ज्यामुळे आता आर्यनसाठी शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान लेकासाठी काही खास गोष्टींची आखणी करत आहेत. (shah rukh khan, Aryan khan)


सूत्रांच्या माहितीनुसार आर्यनसाठी शाहरुख आणि गौरीनं खास डाएट प्लॅनची आखणी केली. इतकंच नव्हे, तर त्याच्यासाठी एका खास सुरक्षा रक्षकाचीही निवडही केली जाणार आहे. 


आर्यनच्या दैनंदिन जीवनामध्ये वेळेला महत्त्वाच्या स्थानी ठेवत गौरी आणि किंग खान त्याच्यासाठी सकाळी उठण्याची वेळ, रात्री झोपण्याची वेळ हे सारं निर्धारित करणार आहे. 


आर्यनच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून त्याच्या व्यायामावरही हे स्टार कपल भर देणार आहे. शिवाय योगसाधनेचं महत्त्वं पाहता यासाठीही त्याचं योगदान घेणार आहेत. 


वाचनाची सवय वाढवण्यासाठी आर्यनसाठी शाहरुखनं काही पुस्तकांची निवड केली आहे, शिवाय त्याला पाहण्यासाठी चांगला कंटेंटही त्यानं शॉर्टलिस्ट केला आहे. इतकंच नव्हे तर, या साऱ्यातून खुद्द शाहरुख आणि गौरी त्यांच्या मुलासोबत अधिकाधिक वेळ व्यतीत करताना दिसणार आहेत.