मुंबई : कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर गायिका कनिका कपूर तिच्या कलेऐवजी या विषाणूमुळेच जास्त चर्चेत आली. पार्टीपासून ते कनिकाच्या संपर्कात आलेल्या काही राजयकीय व्यक्तींपर्यंत सर्वांनाच कोरोनाची धास्ती लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच कनिकावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. लखनऊ येथे सध्या तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याच परिस्थिथीमध्ये तिची एकूण तीन वेळेस कोरोनाची चाचणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. तिन्ही चाचण्यांमध्ये कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं उघड झालं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा म्हणजेच चौथ्यांदा तिची कोरोना चाचणी केली गेल्याची माहिती समोर येत आहे. 


चौथ्या कोरोना चाचणीतही कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता काहींनी चिंता व्यक्त केली आहे. पण, डॉक्टरांनी मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


 


लंडनहून परतल्यानंतर कनिकाला अस्वस्थ वाटू लागलं. ज्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं गेलं. पण, अद्यापही तिचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्हच येत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्य केली आहे. लॉकडाऊन असल्या कारणाने कनिकाला एअरलीफ्टही करता येणं शक्य नाही. त्यामुळे जर ती उपचारांना उत्तर देत नसेल तर आता ही एक अडचण डॉक्टरांपुढएही उभी राहिली आहे. कनिकाची एकंदर परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये तिच्या प्रकृतीत आणखी सुधारणा होतील असंही म्हटलं जात आहे.