कनिका कपूरच्या कोरोना उपचारादरम्यानची मोठी माहिती उघड
कनिकाच्या चारही Coronavirus कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या होत्या ...
मुंबई : परदेशातून परतल्यानंतर बॉलिवूडमधील गायिका कनिका कपूर हिला अस्वस्थ वाटू लागलं. ज्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं गेलं. पुढे तिच्यावर कोरोनाचे उपचारही सुरु झाले. पण, तरीही कनिकाच्या चारही Coronavirus कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या.
सोशल मीडियावर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनीच तिच्याविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. कनिकाच्या प्रकृतीविषयी सुरु असणाऱ्या या चर्चा, मोठ्या प्रमाणावर उठणारं अफवांचं वादळ पाहता आता अखेर तिच्यावर सुरु असणाऱ्या उपचारांविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कनिकावर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आली आहे. 'सध्याच्या घडीला कनिकामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तिची प्रकृती स्छिक आणि उत्तम आहे. तिचं खाणंपिणंही वेळच्या वेळी आणि दैनंदिन सवयीप्रमाणेच सुरु आहे. शिवाय तिची तब्येत बिघडल्याची जी माहिती सर्वत्र चर्चेत आहे ती संपूर्णत: खोटी आहे', असं संजय गांधी पोस्ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. आर.के. धीमान म्हणाले.
कनिकाच्या तब्येतीत बरीच सुधारणा असून, येत्या काही दिवसांमध्ये आता तिची कोरोना चाचणी निगेटीव्ह येताच तिला डिस्चार्जही दिला जाऊ शकतो. त्यामुळे किमात आतातरी तिच्या प्रकृतीविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असंच सर्वांना सांगण्यात येत आहे. शिवाय कोरोनाशी लढण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक फपाय अवलंबात आणण्याचा सल्लाही वारंवार सर्वांना देण्यात येत आहे.