गायिका कनिकाला कोरोनाची लागण, पार्टीत १०० सेलिब्रेटी सहभागी
प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर गायिका कनिकाने कोरोना झाल्याचे लपवले होते. त्यानंतर तिने एक पार्टीही दिली. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे जवळजवळ १०० सेलिब्रेटी सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आता भीतीचे वातावरण परसले आहे.
आता कनिकाला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्या पार्टीमध्ये कोणकोण सहभागी झाले होते आणि त्यांची मेडिकल कंडिशन काय आहे, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. सेलिब्रिटी व्यक्तीने का खबदारी घेतली नाही? तसेच लंडनवरुन परतल्यानंतर तिची तपासणी झाली होती का, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने याबाबत इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिनेच आपल्याला कोविड -१९ झाल्याचे म्हटले आहे. कनिका आणि तिचे कुटुंब सध्या पूर्णपणे अलग ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांने तिच्या पोस्टच्या माध्यमातून दिली.
तिने काय म्हटले आहे पोस्टमध्ये ?
सर्वांना नमस्कार, गेल्या चार दिवसांपासून मला फ्लूची लक्षणे दिसून आली आहेत, माझी स्वतःची चाचणी घेतली गेली आणि ती कोविड -१९ positive आहे. मी आणि माझे कुटुंबीय आता पूर्णपणे अलग आहोत आणि पुढे कसे जायचे या वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरन करीत आहोत. मी ज्या लोकांच्या संपर्कात आहे त्यांचे संपर्क मॅपिंग तसेच सुरू आहे. १० दिवसांपूर्वी जेव्हा मी घरी परतले, तेव्हा सामान्य प्रक्रियेनुसार मला विमानतळावर स्कॅन केले गेले. पण तसे काही दिसून आले नाही. मी नॉर्मल असल्याचे दिसून आले.