संपूर्ण देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. अखेर पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत रामलल्ला (Ramlalla) विराजमान झाले आहेत. देशभरातील मान्यवरांनी या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा पार पडत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बॉलविड अभिनेते, गायक डोळे भरुन सोहळ्याचा अनुभव घेत होते. गायक शंकर महादेवन, कैलाश खेर, मालिनी अवस्थी, सोनू निगम यांनी परफॉर्म केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यादरम्यान युजर्स सोनू निगमचं कौतुक करत आहेत. सोनू निगमच्या परफॉर्न्सवर अनेकजण फिदा झाले आहेत. मंचावर परफॉर्म करत असताना सोनू निगम यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्याला अश्रू अनावर झाले होते. सोनू निगमने गाणं गायल्यानंतर रामलल्लाचं दर्शनही घेतलं होतं. 


सोनू निगमचं ट्रोलरला उत्तर


एका युजरने अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होण्यावरुन सोनू निगमला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण सोनू निगमने त्याला सणसणीत उत्तर देत तोंड बंद केलं. युजरने सोनू निगमचा व्हिडीओ शेअर करत मशिदीवरील भोंग्यावर घेतलेल्या आक्षेपाची आठवण करुन दिली. 'मला सोनू निगमला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला तर लाऊडस्पीकच्या आवाजाचा त्रास होत होता, मग आज स्वत: लाऊडस्पीकरवर गात आहे'.


सोनू निगमने एक्सवरुन ट्रोल करणाऱ्या युजरला उत्तर देत लिहिलं की, "प्रिय युजर्सजी, लाऊडस्पीकरचा त्रास नाही. त्रास सकाळी कोंबड्यांप्रमाणे बांग दिला जातो याचा आहे. पहाटे 4 वाजता होणाऱ्या चिल्लम-चिलीचा आहे. तुम्हाला ज्या पोटदुखीचा त्रास होत आहे त्यावर उपाय वैद्यकीय शास्त्रात नसून अध्यात्मशास्त्रात आहे".



सोनू निगमने दिलेलं उत्तर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. काही युजर्स आता ट्रोल करणाऱ्याला बर्नॉलची गरज आहे असा टोला लगावत आहेत. तर काहींनी सोनू निगमला अशा युजर्सला उत्तर देण्यात वेळ घालवू नको असा सल्ला दिला आहे.