`कुछ कुछ होता है` या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग मेलबर्नमध्ये दिग्दर्शक करण जोहर झाला भावूक
`कुछ कुछ होता है` या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग
मुंबई : दिग्दर्शक करण जोहरचा चित्रपट 'कुछ कुछ होता है' हा ९०च्या दशकातील सुप्परहिट चित्रपट होता. आज पण या चित्रपटाला लोक फार आवडीने बघतात. या चित्रपटापासूनच करण जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाद्वारे करणने बॉलिवूडमध्ये त्यांची चांगली ओळख निर्माण केली. त्याचे नाव चांगल्या चांगल्या घेतले दिग्दर्शकांमध्ये जाऊ लागले.कमी वयात करणने इतकी प्रसिद्ध बॉलिवूडमध्ये मिळवली.
मागील काही दिवसापुर्वी 'कुछ कुछ होता है या चित्रपटाला वीस वर्ष पुर्ण झाले. आता ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नमध्ये दहाव्या भारतीय फिल्म महोत्सवामध्ये (आईएफएफएम) 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग होत आहे. करण या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी फार उत्सूक आहे. करणने म्हटल होत की, माझा २० वर्षाचा हा अनुभव फार समाधानदायक होता.
चित्रपटाचे कथानक सांगतांना आणि कथा सांगतांनाचे मला भेटलेले स्वातंत्र मला फार भावले. चित्रपट बनविणे ही माझी जिद्द आहे. चित्रपटाच्या प्रति मला फार प्रेम आहे. १९९८ला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट पद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत होते. राणी मुखर्जी या चित्रपटात सहायक कलाकारच्या भूमिकेत दिसली होती. जेव्हा की, सलमान खान या चित्रपटात पाहुणे कलाकलाकारची भूमिकेत झळकला होता.
आईएफएफएमच्या संदर्भात करणने म्हटले 'मी या फेस्टिवलमध्ये पहिलेच दाखल झालो आहे आणि इथे येऊन मला फार आनंद होतो. दुसऱ्या देशाच्या भूमिवर भारतीय चित्रपटाचे कार्यक्रम असेल तर मी फार उत्साहित होतो. अशा कार्यक्रमांची मी नेहमीच वाट बघत असतो. करण या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी मुख्य पाहुणे म्हणून शाहरुख खान बोलविण्यात आले आहे. हा कार्यक्रम मेलबर्नमध्ये ८ ते १७ ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे.