अमिताभ बच्चनपासून ते सलमानपर्यंत, पाहा कोण किती कमावतो?
बॉलिवूड स्टार्स एका चित्रपटातून करोडोंची कमाई करतात.
मुंबई : बॉलिवूड स्टार्स एका चित्रपटातून करोडोंची कमाई करतात. पण चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत जिथून ते चित्रपटांपेक्षा जास्त पैसे कमावतात. एखादा स्टार चित्रपट तसंच अनेक अॅड्सद्वारे पैसे कमावतो, तर काही स्टार्स टीव्ही शो होस्ट करून किंवा शो जज करून पैसे कमावतात. अमिताभ बच्चनपासून ते माधुरी दीक्षित, सलमान खानपर्यंत, या यादीत टीव्ही शोद्वारे करोडोंची कमाई करणाऱ्या स्टार्सचा समावेश आहे.
माधुरी दीक्षित
धक धक गर्ल माधुरी दीक्षितने नच बलिए, झलक दिखला जा, डान्स दिवाने यांसारख्या डान्स रिअॅलिटी शोला जज केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीला पर एपिसोड एक कोटी रुपये मिळतात.
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन ज्यांना बॉलीवूडचं बादशाह म्हटलं जातं ते अनेक वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' शो होस्ट करत आहेत. जिथे बिग बी पहिल्या सीझनमध्ये 1 एपिसोडसाठी 25 लाख रुपये घ्यायचे, तिथे ते आता प्रत्येक एपिसोडसाठी 3.5 कोटी रुपये घेतात.
सलमान खान
बिग बॉस ही सलमान खानची दुसरी ओळख बनली आहे. बिग बॉसच्या सीझनच्या होस्टिंगसाठी सलमान 200 कोटी घेतो. म्हणजे प्रत्येक एपिसोडसाठी 8 कोटी 50 लाख रुपये घेतो.
मलायका अरोरा
'झलक दिखला जा' या टीव्ही शोमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावणारी मलायका अरोरा एका एपिसोडसाठी 8 लाख 50 हजार रुपये मानधन घेते.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये कमी दिसते तर टीव्ही शोज जज करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपर डान्सरला जज करण्यासाठी शिल्पा 14 कोटी रुपये मानधन घेते.