मुंबई : बॉलिवूड ही कलाकारांची झगमगती दुनिया आहे. येथे टिकुन राहायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर तुम्हांला गॉडफादरची गरज असते असा काहींचा समज असतो. मात्र सामान्य आणि सिनेसृष्टीशी संबंध नसलेल्या अनेकांनी या क्ष्रेत्रामध्ये आपलं नाव कमावलं आहे.  


भूमी पेडणेकर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''दम लगाके ..' या चित्रपटातून भूमी पेडणेकर बॉलिवूडमध्ये आली. मात्र अभिनयाच्या जोरावर भूमीने आपलं कमावलं आहे. तिच्यामागे कोणताही गॉडफादर नव्हता. 
भूमीचा समावेश फोब्र्स यादीमध्ये प्रभावशाली 30 महिलांमध्ये झाला आहे.  


आयुषमान खुराना  


रिएलिटी शोच्या माध्यमातून आयुषमान खुराना बॉलिवूडमध्ये आला. विक्की डोनर हा आयुषमानचा डेब्यू सिनेमा आहे. त्यानंतर आयुषमानचे अनेक म्युझिक अल्बम बाजारात आले. गायक- अभिनेता अशा कॉम्बिनेशनचा आयुषमान हा लोकप्रिय चेहरा आहे.  


राधिका आपटे  


घरात वैद्यकीय क्षेत्राचं वातावरण असणार्‍या राधिका आपटेनं सिनेक्षेत्राची निवड केली. परदेशात नृत्याचं प्रशिक्षण घेऊन , मराठी, हिंदी सिनेमांमध्ये राधिका आपटेने आपल्या कामाने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे.  



सुशांतसिंग राजपूत  


हिंदी मालिकांमधून आलेला सुशांतसिंग राजपूत हा कलाकार आज बॉलिवूडमध्ये आघाडीचा तरूण कलाकार बनला आहे. 'एम.एस.धोनी', 'काय पो छे' अशा चित्रपटातून सुशांतने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 



राजकुमार राव 


राजकुमार रावच्या चित्रपटाची झेप ऑस्कर सिनेमांपर्यंत पोहचली आहे. यंदा राजकुमार अभिनित 'न्युटन' ऑस्करच्या यादीमध्ये आहे.  त्याच्या अभिनयाची कारकीर्द लव सेक्स अ‍ॅन्ड धोका या चित्रपटातून झाली आहे.