मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा काही काळापासून बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये सुरू आहेत. जरी या दोघांनी आत्तापर्यंत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाहीये. परंतु यापूर्वी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्याविषयी असं वृत्त आलं होतं की, दोघांनीही लग्न केलं आहे. त्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी त्यांचं हे वृत्त फेटाळून लावलं होतं. आता विकी कौशलचा भाऊ सनी कौशलनेही या अहवालांवर प्रतिक्रिया दिली आहे आणि विकी आणि कतरिनाच्या साखरपुड्याच्या बातमीवर त्याच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती हे त्याने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीमध्ये बोलताना सनी म्हणाला, 'मला आठवतं की, विकी सकाळी जिमला गेला होता, तेव्हाच त्याच्या आणि कतरिनाच्या साखरपुड्याच्या बातम्या येऊ लागल्या. जेव्हा तो घरी परतला, तेव्हा आई आणि वडिलांनी गंमतीने त्याला विचारलं, 'अरे यार, तुझा साखरपुडा झाला आहे'. मिठाई दे. यावर विक्की म्हणाला, जितकी खरा साखरपुडा झाला आहे तितकीच खरी मिठाईसुद्धा असेल.


सनी पुढे म्हणाला- 'हे सगळं कोठून आलं हे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही सगळे त्यामुळं खूप हसत होतो.' अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी विकी आणि कतरिनाच्या साखरपुड्याच्या बातम्यांची आधीच चुकीची माहिती दिली आहे. मात्र, दोघंही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आहेत.


कतरिना विकी कौशलच्या भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप या चित्रपटाच्या प्रीमियरलाही मुंबईत हजर होते. याशिवाय, त्यांनी अलीकडेच शेरशाह प्रीमियरलाही हजेरी लावली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, कतरिना रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीच्या रिलीजची वाट पाहत आहे. याशिवाय ती आजकाल मनीष शर्माच्या 'टायगर 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ती फोन भूतमध्येही दिसणार आहे.