Entertainment News : प्रेम... प्रेम नाम है मैरा... प्रसिद्ध खलनायकाचा हा डायलॉग हिंदी सिनेमासृष्टीत चांगलाच गाजला. ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांनी अनेक सिनेमात खलनायकाची (Villain) भूमिका साकारली. त्यावेळचे ते प्रसिद्ध खलनायकांपैकी एक म्हणजे प्रेम चोप्रा. प्रेम चोप्रा यांची बायोग्राफी (biography) प्रसिद्ध होत असून यात त्यांच्या हिंदी सिनेमा सृष्टीतील अनुभवांबाबत लिहिण्यात आलं आहे. 'प्रेम नाम है मेरा' असं या बायोग्राफीचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या बायोग्राफीमध्ये प्रेम चोप्रा यांनी वेगवेगळे किस्से सांगितले आहेत. यातील एक किस्सा म्हणजे सिने कारकिर्दीत प्रेम चोप्रा यांनी 250 पेक्षा जास्त रेप सीन केले आहेत. या रेप सीनमागची कहाणीसुद्धा त्यांनी सांगितली आहे. 


अभिनेत्रीने किस करण्यास दिला होता नकार
एका सिनेमात एका अभिनेत्रीने प्रेम चोप्रा याना किस करण्यास नकार दिला होता. त्यावेळची ती टॉप अभिनेत्री होती. त्या अभिनेत्रीचं एका टॉप अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध सुरु होते. सिनेमात एक सीन होता, ज्यात अभिनेत्रीला किस करायचं होतं. सुरुवातीला ती अभिनेत्री तयार झाली. चित्रीकरण सुरु झालं. तितक्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड सेटवर पोहोचला.


त्याला पहाताच अभिनेत्रीने किसचा सीन देण्यास नकार दिला. जेव्हा किस घेण्यास जात असे तेव्हा ती चेहरा फिरवत असे. असं अनेकवेळा झालं. या घटनेने आपण चांगलेच संतापलो होतो. बऱ्याच वेळानंतर अखेर तो सीन शूट झाला आणि दिग्दर्शकाने सुटकेचा निश्वास सोडला.


सरकारने दिला होता इशारा
प्रेम चोप्रा यांनी सांगितलं त्यावेळी बलात्काराची दृश्ये चित्रपटांमध्ये फारशी दाखवली जात नव्हती. साउंड इफेक्ट्स, लाऊड ​​म्युझिक आणि कटवेजच्या माध्यमातून बंद दरवाजाआडून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येत असतं. पण निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही गरजेशिवाय बलात्काराची दृश्य टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता. 70 च्या दशकात सरकारने रेप सन कमी करण्यास सांगितलं होतं. 


रेप सीनच्या विरोधात
वास्तविक रेप सीन करायला आपल्याला कधीच आवडलं नाही असं प्रेम चोप्रा यांनी म्हटलंय. पण त्या सिनेमाची गरज असल्याने असे सीन करावे लागत होते. हिंसाचार आणि सेक्सचा बॉक्स ऑफिसवर बूस्टर म्हणून वापर करण्याच्या आपण पूर्णपणे विरोधात असल्याचंही प्रेम चोप्रा यांनी आपल्या बायोग्राफीत नमुद केलं आहे.