Siddharth-Kiara Wedding: कियाराच्या वाट अखेर संपली, नवरदेव सिद्धार्थ मल्होत्रा पोहचला जैसलमेरला!
नुकत्याच आलेल्या फोटोंमधून दिसते आहे की, सिद्धार्थ आपल्या संपुर्ण परिवारासह जैसलमेरला पोहचला आहे. त्याचे काही लेटेस्ट फोटोज हे इन्टाग्रामवरती शेअर होत आहेत.
Siddharth-Kiara Wedding: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची. ते दोघं 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सुर्यागढ हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. त्या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाील आहे. त्यामुळे सगळीकजडेच त्यांच्या लग्नाच्याच चर्चा आहेत. कियारा आपल्या परिवारासह जैसलमेर येथे पोहचली आहे. त्याचसोबत आता सिद्धार्थही त्याच्या परिवारासह वेडिंग व्हेन्यूसाठी रवाना झाला होता आता तोही जैसलमेरमध्ये पोहचला आहे. (Bollywood Wedding Actor Siddarth Malhotra reaches jaisalmer siddarth kiara wedding venue)
नुकत्याच आलेल्या फोटोंमधून दिसते आहे की, सिद्धार्थ आपल्या संपुर्ण परिवारासह जैसलमेरला पोहचला आहे. त्याचे काही लेटेस्ट फोटोज हे इन्टाग्रामवरती शेअर होत आहेत. या फोटोंत तो ब्लॅक टी-शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसतो आहे. त्याचसोबत त्याचे कुटुंबियही असून त्याच्या हातात हलकी बॅगही आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या वेडिंग लोकेशनचेही फोटोज व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाची. गेल्या सहा महिन्यांपासून कियारा आणि सिद्धार्थ कधी लग्न करणार याच्या चर्चांना जोरदार उधाण आले होते. तेव्हापासूनच कियारा आणि सिद्धार्थ कधी लग्न करणार या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे सगळीकडेच फक्त कियारा आणि सिद्धार्थच्याच लग्नाची चर्चा होती. त्या दोघांनी मात्र यामध्ये आपलं मौन पाळलं होतं. ऑगस्ट 2021 मध्ये आलेल्या शेरशहा या चित्रपटात ते दोघंही एकत्र होते तेव्हा पासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता याआधीही ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.
कियारा आणि सिद्धार्थच्या मागे किती संपत्ती आहे, त्यांची वेडिंग गेस्ट लिस्ट काय आहे, त्यांनी लग्नात एकूण किती खर्च केला आहे ते ्त्यांच्या लग्नात कोणकोणती पंचपकावनं असतील या सगळ्यांचीच सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. कियारा आणि मनीष मल्होत्राचा एकत्र फोटो काही वेळापुर्वा व्हायरल झाला होता. कियाराच्या खास बॉलिवूड मित्रमंडळींही लग्नाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तुम्हीही कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी उत्सुक आहेत ना?