मुंबई : कोरोना महामारीनंतर देशाची आर्थिक घडी विस्कटली होती. पण आता हळू-हळू सर्व गोष्टी पूर्व पदावर येत आहे. कोरोना व्हायरसचा फटका बॉलिवूड विश्वाला देखील बसला. पण आता सिनेमागृहाकडे पुन्हा प्रेक्षक वळले आहेत. कोरोनानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर स्टारर 'रूही' सिनेमा रूपेरी पडद्यावर दाखल झाला. पण अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी 'मुंबई सागा' सिनेमाच्या स्थगितीवर मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 मार्च म्हणजे आज रूपेरी पडद्यावर सिनेमा प्रदर्शित करण्यात न्यायालयाने मंजुरी दिली आहे. सिनेमाला स्थगिती मिळावी ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सिनेमाच्या चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 



न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाने रवी मल्लेश बोहरा आणि दिवंगत गुंड अमर नाईक यांच्या परिवाराची याचिका फेटाळली आहे.


सिनेमा खऱ्या घटनांवर आणि बोहरा, नाईक आणि त्याचा भाऊ अश्विन नाईक यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा याचिकाकाकर्त्यांनी केला आहे. सिनेमात गोपनीयता आणि न्याय चाचणीच्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे असं देखील याचिकाकर्त्यांना म्हटलं.